Header Ads

Loknyay Marathi

बाळासाहेब, आपण होता म्हणून...!

बाळासाहेब, आपण होता म्हणून...! 

-सौ. जयश्री हाटकर-व्हरगर / सांगली 

 पश्चिम महाराष्ट्रावर २०१९ च्या ऑगस्ट महिन्यात अस्मानी संकट कोसळले. मुसळधार पावसाने सर्वत्र हाहा:कार माजविला. सांगली जिल्ह्यात संत वाहणाऱ्या कृष्णामाईने अक्षरश: आपले अक्राळविक्राळ रुद्ररूप धारण केले. शेतं पाण्याखाली गेली. हळू हळू घरही पाण्याखाली जावू लागली. इतका महाप्रलयंकारी महापूर येईल याचा कोणालाच अंदाज बांधता आला नाही. सर्वजण जीव वाचविण्यासाठी जीवाच्या अकांताने प्रयत्न करू लागले. यात महापूराचा कृष्णाकाठच्या पलूस तालुक्याला सर्वात मोठा फटका बसला. तालुक्यातील गावेच्या गावे पाण्याखाली गेली. या लोकांना मदतीसाठी सर्वोतोपरी पुढे सरसावले ते मा. ना. डॉ. विश्वजीत पतंगराव कदम तथा बाळासाहेब.

ना. डॉ. विश्वजीत कदम साहेब स्वत: महापूरात पाण्यात उतरून लोकांना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करू लागले. प्रत्येकजण स्वत:चा जीव वाचवण्यासाठी व सुरक्षित स्थळी पोहोचण्यासाठी बोटीत बसण्याची घाई-गडबड करत होता. अशा वेळेस डॉ. विश्वजीत कदम साहेब प्रत्येक व्यक्तीला सांगत होते, की बोटीत क्षमतेपेक्षा जास्त लोक बसू नका. जोपर्यंत या गावातील शेवटचा व्यक्ती सुरक्षित स्थळापर्यंत बाहेर पोहोचत नाही, तोपर्यंत मी येथून हलणार नाही. त्यामुळे कृपया घाई करू नका.

डॉ. विश्वजीत कदम साहेब बुर्ली येथे बचाव कार्यात असताना त्याच्या कानावर एक हृदयद्रावक दुर्दैवी घटना पडली, बोट दुर्घटनेत ब्रम्हनाळ येथील १७ जणांचा मृत्यू झाला. बोटीच्या क्षमतेपेक्षा जास्त लोक बसल्यामुळे ही दुर्घटना झाली होती. तेथून ते घटनास्थळी पोहोचले व लोकांना धीर दिला.
महापूरातून बाहेर काढलेल्या नागरिकांना भारती विद्यापीठाच्या शाळा, महाविद्यालयांमध्ये पूर ओसरेपर्यंत निवारा दिला. भोजनाच्या सोयी केल्या. मा. विजयमाला कदम तथा वहिनीसाहेब व सौ. स्वप्नाली विश्वजीत कदम यांनी स्त्रियांना साड्या, लहान मुलांना गरम कपडे, अबालवृद्धांना कपडे, चादरी, ब्लँकेट्स आदी पुरवून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेवून मदत केली.

अंगावरच्या कपड्यानिशी बोटीमधून जीव वाचवत घराबाहेर पडलेल्या लोकांच्यासमोर त्यांनी जीवापाड प्रेम केलेले पशुधन होते. त्यांचे पुढे काय होईल? हा एकच प्रश्न होता. त्यावेळी मा. ना. डॉ. विश्वजीत कदम साहेब व लोकनेते मा. . मोहनराव कदम तथा दादा यांनी महापूरातून वाचाविलेल्या जनावरांसाठी सोनहिरा साखर कारखान्याच्या माध्यमातून चार छावण्या सुरु केल्या. सर्व शेतं, पीकं उधवस्त झाल्याने महापूरानंतरही चारा पुरविला. पूराच्या पाण्याने आजारी पडलेल्या जनावरांना भारती हॉस्पिटल मार्फत पशुवैद्यक डॉक्टरांची पथके पुरवून औषधोपचार केले.

महापूर ओसरल्यानंतर एक मोठा प्रश्न होता तो स्वच्छतेचा आणि आरोग्याचा. मा. ना. डॉ. विश्वजीत कदम साहेबांनी भारती विद्यापीठातील सर्व सेवक व विद्यार्थ्यांची मदर घेवून लोकांची गुडघाभर गाळ असलेली घरे, गावे स्वच्छ करून दिली. त्याचबरोबर डॉ. अस्मिता जगताप ताईंनी प्रत्येक गावोगावी भारती हॉस्पिटलची डॉक्टरांची पथके पाठवून स्वत: आजारी व्यक्तींशी संवाद साधून त्यांच्यावर मोफत औषधोपचार केले व लोकांचे रोगराईपासून रक्षण केले. या सर्व कार्यात सर्व कदम कुटुंबीय अहोरात्र झटत होते.

महापूरानंतर लोकांपुढे उध्वस्त झालेली घरे, आयुष्यभर काबाडकष्ट करून उभे केलेले संसार पाहून आसवे अनावर झाली होती. त्यांना धीर देत मा. ना. डॉ. विश्वजीत कदम साहेबांनी पुढे त्यांच्या पुनर्वसनाचे काम हाती घेतले. त्याचे व्यवस्थित नियोजन करून धान्य, तांदूळ, डाळी, साबण, कपडे, चादरी, चटया, भांडी, टूथब्रश, टूथपेस्ट, डासांसाठी कॉईल्ससह सर्व प्रकारचे गृहोपयोगी वस्तूंचे किट वाटप सुरु केले व लोकांचे संसार पुन्हा एकदा नव्याने उभे केले. त्यांना सर्वोतोपरी मदत करून एका देवदूताप्रमाणे पाठीशी उभे राहिले. म्हणूनच महापूरानंतर मा. ना. डॉ. विश्वजीत कदम साहेब लोक आपणास म्हणू लागले,

बाळासाहेब आपण होता म्हणून... आमचा जीव वाचला!’
बाळासाहेब आपण होता म्हणून... आमचे पशुधन वाचले!’
बाळासाहेब आपण होता म्हणून... आम्ही रोगराईतून बाहेर पडलो!’
बाळासाहेब आपण होता म्हणून... आमचे संसार पुन्हा नव्याने उभे राहिले!’
बाळासाहेब, आपण जनतेसाठी केलेल्या कामाचे मोल इतके महान आहे, की त्याची कशाशीही गणना होवूच  शकत नाही. लोक कायम तुमच्या ऋणात राहतील. सर्वांचे सहकार्य व थोरांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतील. तुम्ही पुन्हा एकदा आमदार म्हणून महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलात व आज महाराष्ट्राचे कृषी व सहकार राज्य मंत्री झाल्याबद्दल सर्वांतर्फे पुढील कार्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!
(Dr. Vishwajeet Patangrao Kadam)