Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे वैज्ञानिक मॉडेल स्पर्धा संपन्न

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे वैज्ञानिक मॉडेल स्पर्धा संपन्न


भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व मायक्रोबायलोजीस्टस असोसिशन, इंडिया यांचे संयुक्त विद्यमाने मॉडेल्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये बीएस् सी भाग एक, भाग दोन, भाग तीन व एम एस् सी भाग एक अशा एकूण 36 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सदर मॉडेल्स स्पर्धा ही 'टाकाऊ पासून टिकाऊ' या थीमनुसार आयोजित केली होती. विद्यार्थ्यांनी सूक्ष्मजीवशास्त्रातील विविध संकल्पना,उपकरणे, कोरोना व इतर सूक्ष्मजीवांची आंतर व बाह्य  रचना,डी.एन.ए.ची रचना आणि कार्य इत्यादी विषयां वर मॉडेल्स सादर केली. प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे यांनी फीत कापून स्पर्धेचे उद्घाटन केले, सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व कौतुक केले. सदर कार्यक्रमाचे  नियोजन आणि उपस्थितांचे स्वागत सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा. भारती भावीकट्टी यांनी केले. या कार्यक्रमासाठी रसायनशास्त्र विभागाचे प्रा. ए. आर. सुपले उपस्थित होते. सदर कार्यक्रमाकरिता सूक्ष्मजीवशास्त्र विषयाचे सर्व प्राध्यापक उपस्थित होते.


स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे:
बीएससी भाग एक व भाग दोन
प्रथम क्रमांक- कासम स. सनदी.
द्वितीय क्रमांक- दिपाली ब.पाटोळे व प्रेरणा ल. पाटील.
तृतीय क्रमांक- सौरभ अ. कोळी व पियुष अ. वाडकर.


बीएससी भाग तीन व एम एस सी भाग एक
प्रथम क्रमांक- सुरज स. सनदी व सौरभ क. जाधव.
द्वितीय क्रमांक- सौरभ र. कांबळे व अभिषेक स. माने.
द्वितीय क्रमांक- निशांत व. मोहिते व शिवदत्त अ. देसाई.
तृतीय क्रमांक- प्रथमेश प. गावडे व धीरज कोळी.
उत्तेजनार्थ प्रथम - ऋतुजा ब. गायकवाड व अंजुम य. शिकलगार.
उत्तेजनार्थ द्वितीय - रोजीया स. नदाफ.


(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)