कोरोना व्हायरस: जाणून घ्या ...
कोरोना व्हायरस (Corona Virus): जाणून घ्या ...
नवीन वर्षाच्या सुरुवातीस एक नवीन आव्हान जगासमोर
उभे ठाकले आहे, एक व्हायरल इन्फेक्शन, ज्याला कोरोना व्हायरस (Corona Virus) असे म्हटले जाते.
कोरोना
विषाणू आहे काय?
'कोरोना व्हायरस' सध्या
हे नाव सगळीकडे पसरत आहे. 'चीन' या
देशातून हा व्हायरस आल्याचे समजत आहे. सध्या चीनच्या 'वुहान'
शहरात आणि या देशात या कोरोना व्हायरसने थैमान मांडला आहे. रुग्णांमधून घेतलेल्या या
विषाणूच्या सॅम्पलची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. त्यानंतर चीनचे अधिकारी आणि
जागतिक आरोग्य संघटनेने हा कोरोना वायरस असल्याचं सांगितलं. आता हे व्हायरस फ्रान्स, अमेरिका, जपान, थायलंड, आणि इंग्लंडसह
अजून बऱ्याच देशात पसरत चालला आहे. या व्हायरसाची लागवण खूप प्राणघातक आहे. ह्याचे
विषाणू झपाट्याने वाढतात. हा एक नवीन व्हायरस असून सार्स severe acute
respiratory syndrome (SARS) नावाच्या कोरोनाचे विषाणू पेक्षा हे
विषाणू जास्त घातक आहे.
2002 -2003 साली सार्स नावाच्या विषाणूंमुळे 8,098
लोक संक्रमित झाले होते. ह्यात 774 लोकं मरण
पावले. डिसेंबर 2019 च्या पहिल्या आठवड्यात नवीन कोरोना
व्हायरस सापडला. त्याला कोरोनाचा नवा विषाणूंचा प्रकार घोषित केला गेला. या पूर्वी
6 अजून कोरोना व्हायरसची निश्चिती झाली असून सध्याच्या
व्हायरसाचा हा 7 वा प्रकार आहे.
कोरोना
विषाणू आला कुठून?
कोरोना व्हायरस हा खास प्रकारच्या प्रजातींमध्ये आढळणारा
व्हायरस आहे. यात साप, वटवाघूळ यांसारख्या प्राण्यांचा समावेश आहे. जेव्हा हा
व्हायरस मानवी शरीरात पोहोचला तेच त्याने स्वत:ला अस विकसित केलं की. तो
मनुष्यांमाध्येही जीवंत राहील. त्याचं हे बदललेलं रूपच वैज्ञानिकांसाठी आव्हान
आहे.
कोरोनाची
लक्षणे
-
डोकेदुखी
-
नाक गळणे
-
खोकला
-
घसा खवखवणे
-
ताप
-
अस्वस्थ वाटणे
-
शिंका येणे, धाप लागणे
-
थकवा जाणवणे
-
निमोनिया, फुफ्फुसात सूज
Post a Comment