Header Ads

Loknyay Marathi

महाराष्ट्रास लाभेल नवी उभारी.., आपल्या बाळासाहेबांना मंत्री पदाची जबाबदारी

अमोल वंडे – भिलवडी l दि. ३०/१२/२०१९ - 9890 546 909



"ये तो बस अभी शुरवात है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त"

"नवचैतन्याची  धार ..नेतृत्वाची उभार.. अन्यायावर प्रहार" अशी ज्यांच्या जीवन प्रवासाची वैशिष्ठे आहेत,त्या पलूस कडेगाव मतदारसंघाचे  “सोनहि-या च्या वाटांवर...कृष्णेच्या काठावर” प्रतिनिधित्व करत असलेले कर्तुत्वसंपन्न आमदार म्हणजे मा.डॉ.विश्वजीत पतंगराव कदम यांची आज राज्यमंत्री पदी निवड झाली आणि शपथ घेत असताना अवघा आसमंत शहारून गेला.

अवघ्या काही महिन्यांपूर्वीचा साहेबांचा विरह त्यातून स्वत: सावरत,इतरांना आधार देत अडचणीच्या प्रत्येक क्षणी मतदारसंघाला मायेची ऊब देणा-या आपल्या  बाळासाहेबांचा शपथविधी  पाहून प्रत्येकाच्या मनात आज स्वप्नपूर्तीचा आनंद आहे.

बाळासाहेबांचा मंत्रीपदा पर्यंतचा प्रवास हा निश्चितच प्रेरणादायी असाच  आहे,डॉ.पतंगराव कदम साहेबांचा वारसा जरी असला तरी स्वत: जमिनी वर उतरून शेवटच्या घटका पर्यंत पोहचण्यासाठी त्यांनी आजवर केलेले कष्ट विसरून चालणार नाहीत.१९९९ ला वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी समाजकारणात सक्रीय होऊन साहेबांच्या व आ.मोहनराव कदम दादांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील विविध घटकांकरिता निरंतर  कार्यरत राहण्याचे काम बाळासाहेबांनी मोठ्या जबाबदारीने पार पाडले.

सामाजिक,शैक्षणिक,राजकीय,सहकार क्षेत्रात कार्यरत असतानाच सलग दोन वेळेस निवडणुकीतून युवक काँग्रेस चे अध्यक्ष पद भूषवत अवघ्या राज्यातील युवकांना एकत्र केले व आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली.

साहेबांच्या निघून जाण्यानंतर कर्तुत्व,नेतृत्व,दातृत्वाच्या अनोख्या संगम असणा-या बाळासाहेबांची विधानसभेवर बिनविरोध झालेली निवड खूप काही सांगून जाते.साहेबांच्या पाऊलावर पाऊल ठेवत कार्यरत असताना पहिल्याच विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राज्यात विक्रमी मताधिक्याने निवडून येण्याचा बहुमान हि त्यांनी संपादन केला.

समाजातील सामान्यांच्या  विविध प्रश्नांची सखोल जाण असणा-या बाळासाहेबांच्या मंत्रिमंडळातील निवडीनंतर महाराष्ट्राला एक निश्चित नवी दिशा व नवी उभारी लाभेल  यात काही शंका नाही.

बाळासाहेबांवर प्रेम करणा-या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आज एकच भावना आहे,

"ये तो बस अभी शुरवात है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त"

यापुढे त्यांना याही पेक्षा अधिक मोठ्या जबाबदारी निश्चित पार पाडाव्या लागतील यात शंका नाही ...सर्वसामान्य जनतेच्या विश्वासावर,..जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे नेतृत्व बाळासाहेब करत आहेत..त्यांच्या भावी वाटचाली करिता मन:पूर्वक  शुभेच्छा..!