Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात स्वयंनिर्मित राखी प्रदर्शन

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात स्वयंनिर्मित राखी प्रदर्शन 


सांगली: भारती विद्यापीठाच्या डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात स्वयंनिर्मित राखी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.जी.कणसे यांच्या शुभहस्ते झाले. या प्रदर्शनात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. इकोफ्रेंडली, चंद्रयान ३ तसेच विविध नैसर्गिक वस्तुंचा वापर करून आकर्षक व रंगीबेरंगी राख्या तयार केल्या होत्या. यावेळी  प्राचार्य डॉ.कणसे, उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, प्रा. सावंत आणि प्रा. अरूण जाधव यांना विद्यार्थिनींनी राख्या बांधल्या.  उपस्थित विद्यार्थ्यांना डॉ. कणसे यांनी राखी पौर्णिमेचे महत्त्व सांगितले. या वेळी बोलताना ते म्हणाले की, अशाप्रकारचे सण, समारंभ साजरे करत असताना आपण आपली संस्कृती टिकवून ठेवत असतो. रक्षाबंधन हा सण संपूर्ण देशात साजरा केला जातो. यातून बहीण-भावाचे पवित्र नाते अधिक दृढ होते. आपल्या संस्कृतीचा वसा आणि वारसा आपण पुढे चालवला पाहिजे. 


या प्रदर्शनातून  प्रथमेश मोहिते यांस प्रथम क्रमांक, कु. रितू केवट आणि आरती केवट विभागून द्वितीय क्रमांक तर कु. पूजा मद्रासी हिने तृतीय क्रमांक पटकावला.  यावेळी परीक्षक म्हणून वरिष्ठ विभागाच्या प्रा.रोहिणी वाघमारे व प्रा.जयश्री हाटकर यांनी काम पाहिले. 
           
या प्रदर्शनाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. वासंती गावडे यांनी केले तर आभार  प्रा. आर. एस. काटकर यांनी मानले.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)