Header Ads

Loknyay Marathi

अष्टपैलू युवा नेतृत्व- मा. ना. डॉ. विश्वजीत कदम


अष्टपैलू युवा नेतृत्व- मा. ना. डॉ. विश्वजीत कदम
सौ. जयश्री हाटकर-व्हरगर

महाराष्ट्र राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री, भारती विद्यापीठाचे कार्यवाह मा. ना. डॉ. विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शब्द सुमनांची शुभेच्छा!

महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात, अर्थकारणात तसेच सहकार, कृषी, औद्योगिक क्षेत्रात सांगली जिल्हा सातत्याने वरचढ ठरला आहे. वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, डॉ. पतंगराव कदम यांच्या सारखे अनेक राजकीय धुरंधर सांगली जिल्ह्यात घडले. त्यांनी सांगली पासून दिल्ली पर्यंत जिल्ह्याचा दबदबा वाढविला आहे. त्यातून नव्या पिढीला बाळकडू मिळत गेले. डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या पावलावर पाऊल ठेवून मा. ना. डॉ. विश्वजीत कदम तथा बाळासाहेबांनी राजकीय, सामाजिक क्षेत्रात यशस्वी भरारी घेत समाजकल्याण कार्यात अग्रेसर राहत उत्तुंग झेप घेतली आहे.

डॉ. विश्वजीत कदम साहेबांनी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रभावी काम केले आहे. दुष्काळात 42 लोकसभा मतदार संघात 100 दिवसांची 1600 किलोमीटर पदयात्रा करून दुष्काळी जनतेला साथ दिली. 

गोरगरीबांची कामे आणि गरजू लोकांना मदत करताना ते कधीच वेळेचे बंधन पाळत नाहीत. राज्यातील दुष्काळ असो किंवा नैसर्गिक आपत्ती, सर्वसामान्यांच्या पाठिशी उभे राहणे हा त्यांचा विशेष गुण आहे. डॉ. पतंगराव कदम साहेबांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांचे विचार व विकास कामांचा वारसा मा. ना. डॉ. विश्वजीत कदम यांनी जोपासला आहे. ऑगस्ट 2019 मध्ये पावसाने थैमान घातले तेव्हा सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात तर पूरस्थितीने रौद्ररूप धारण केले. यामध्ये बहुतांश गावे वाहून गेली. अशा दयनीय परिस्थितीत मा. ना. डॉ. विश्वजीत कदम साहेब देवदूताप्रमाने धावून आले व अहोरात्र झटत राहिले. स्वतः पाण्यात उतरून सर्व पूरग्रस्तांची पाण्यातून सुटका होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. सर्व पूरग्रस्त लोकांसाठी अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टी पुरविल्या व त्यांचे पशूधनही वाचविले, त्यांचे संसार नव्याने उभे केले तसेच त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. 

आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या कार्याची दखल जनतेने घेतली आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक मताधिक्याने त्यांना विजयी केले. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सहकार,  कृषी, सामाजिक न्याय, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ, मराठी भाषा राज्यमंत्री पदी त्यांची निवड झाली. मा.ना. डॉ. विश्वजीत कदम यांच्या मंत्रीपदामूळे पलूस-कडेगाव मतदार संघाबरोबरच जिल्ह्याचा व राज्याचा मोठ्या प्रमाणात विकास होण्यास मदत होणार आहे. गोरगरीब सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवून सांगली जिल्ह्याचा दबदबा राज्यापासून दिल्लीपर्यंत मा.ना. डॉ. विश्वजीत कदम साहेब नक्कीच करतील.

डॉ. पतंगराव कदम साहेबांच्या विचारांची व विजयमाला कदम ( वहिनीसाहेब ) यांच्या संस्काराची शिदोरी घेऊन त्यांची वाटचाल सुरू आहे. नव्या पिढीचे अष्टपैलू नेतृत्व असलेल्या मा. ना. डॉ. विश्वजित कदम यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
(Dr. Vishwajeet Patangrao Kadam)