yuva MAharashtra शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरुम उभारा - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरुम उभारा

शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरुम उभारा
शासनातर्फे शाळांना अनुदान दिले जाते मात्र शाळांमधून दर्जेदार शिक्षण दिले जाते आहे का हे तपासावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिल्या. बदलत्या तंत्रज्ञानानुसार शिक्षण पध्दतीत बदल होणे आवश्यक असून राज्यातील सर्व शाळांमध्ये मव्हर्च्युअल क्लासरुम उभारण्याबाबतचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने तातडीने सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक झाली. त्यावेळी ते मुख्यमंत्री  बोलत होते. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निंगवर भर देत असताना राज्यातील वंचित व दुर्गम शाळांसाठी व्हर्च्युअल क्लासरूम अत्यंत महत्वाचे ठरतील. मव्हर्च्युअल क्लासरूम यंत्रणेमध्ये फक्त शिक्षकच विद्यार्थ्यांना शिकवणार नाही तर दोन्ही बाजूंनी संवाद होण्यास मदत होईल. शिक्षण हा राज्य सरकारचा प्राधान्याचा विषय आहे. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देणे हेच शिक्षकांचे काम असल्याने त्यांच्यावर अतिरिक्त कामांचा बोजा पडणार नाही याबाबत काळजी घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी व्हावे व काळानुरूप शिक्षणाची कास धरावी या उद्देशाने ई लर्निंगवर भर देत असताना विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी आठवी, नववी आणि दहावीचा अभ्यासक्रम देता आला तर विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सोपे होईल. विज्ञान विषय निमेशन स्वरुपात आणि गणित विषय अधिक सोप्या पध्दतीने मांडण्यात आला तर या दोन विषयांबद्दल विद्यार्थ्यांना वाटणारी भीती नक्कीच कमी होईल. ई लर्निंगचा आणखी एक फायदा होईल तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी होईल. त्यामुळे र्व्हच्युअल क्लासरुमबरोबरच ई लर्निंगवर विभागाने अधिकाधिक भर द्यावा असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

स्कूल बसची सुरक्षितता तपासा:
शिक्षण क्षेत्रात सरकारसोबत काम करण्याची उद्योजकांनी सहमती दाखविल्याने शालेय शिक्षण विभागाच्या उपक्रमात या उद्योजकांची मदत कशी घेता येईल याबाबतही नियोजन करण्यात यावे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणे, शाळेत येण्या जाण्यासाठी असलेल्या स्कूल बसची सुरक्षितता शाळांनी तपासून घेणेही आवश्यक असल्याचे ठाकरे म्हणाले.