yuva MAharashtra From Principal Desk - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

From Principal Desk




आपल्या सर्वांचे
“BVDPKM NEWS (ई वाचन कट्टा)” च्या व्यासपीठावर मन:पूर्वक स्वागत..!

वाचन संस्कृती रुजणे ही काळाची गरज आहे. आजच्या काळात पुस्तकांचे वाचन कमी होत चालले आहे हे वास्तव आहे. पण वाचन खरच कमी होत आहे अस नाही, वाचनाचे माध्यम बदलत चालले आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये डिजीटल माध्यमांवर प्रचंड वाचन होत असून आपण अधिकाधिक ज्ञान उपलब्ध करून देण्याची गरज आहे आणि हीच गरज ओळखून जगभरातील वाचकांसाठी आम्ही “ BVDPKM NEWS (ई वाचन कट्टा) ” या डिजीटल व्यासपीठाची महाविद्यालय च्या माध्यमातून  सुरवात करीत आहोत.

हे विश्वची माझे घर असे शिकविण-या आपल्या भारतीय संस्कृती चा आदर्श घेत आज चार भिंतीच्या बाहेरील जगापर्यंत माहिती पोहचविणे, व डिजीटल स्वरुपात ग्रंथालयांनीही पुस्तके उपलब्ध करून देणे आज क्रमप्राप्त आहे. महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या ग्रंथपाल प्रा. जयश्री हाटकर यांनी वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी सुरु केलेले हे व्यासपीठ निश्चितच आदर्शवत ठरेल व माहितीचा मुक्त स्त्रोत जगभरात पोहचविण्यात खारीचा वाटा नक्की उचलेल ही खात्री आहे.