About us
नवनवीन दैनंदिन माहितीने आपलं विश्व समृद्ध करणा-या “BVDPKM NEWS (ई वाचन कट्टा)” च्या व्यासपीठावर आपल्या सर्वांचे सस्नेह स्वागत..!

निरीक्षण शक्ती, नवीननवीन शोध घेण्याचा दृष्टीकोन, विधायक कार्य करण्याची प्रेरणा, सकारात्मक विचार हे वाचनातूनच प्राप्त होत असतात. नवनिर्माण करण्यासाठी आवश्यक असणारी आंतरिक ऊर्जा ही वाचनातूनच मिळते. मानवाच्या प्रतिभा, कल्पकता व बुद्धिमत्तेच्या विकासासाठी वाचन हीच पायाभूत गोष्ट आहे. म्हणून समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रतिभाशक्तीच्या विकासाबरोबर नवनिर्माणासाठी वाचनातूनच चालना मिळते. आधुनिकीकरणाच्या काळात युवकांचा सोशल मिडीयाचा अतिरेक वाढत असताना त्यांना वाचनाकडे वळविण्यासाठी बदलत्या काळानुसार ग्रंथालायानेही बदलणे ही काळाची गरज ठरली आहे.
याच संकल्पनेतून इ-बुक, इ-जर्नल, इ-डेटाबेस, डिजीटल ग्रंथालये, पेपरलेस ग्रंथालये निर्माण होत आहेत. वाचक ग्रंथालयांकडे पाठ फिरवत आहेत या अनुभवातून ‘ग्रंथालय आपल्या दारी’ या संकल्पनेच्या पुढे जावून ‘ग्रंथालय आपल्या हाती’ हा उपक्रम सुरु करत असताना अत्यानंद होत आहे. एक ग्रंथपाल म्हणून फक्त पुस्तकं देव-घेव न करता वाचकांना सामाजोपयोगी व ज्ञानविश्व समृद्ध करणारी वाचनीय माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देण्याचा, महाविद्यालयात राबविले जाणारे विविध उपक्रम आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न म्हणजे ई वाचन कट्टा…!