सह्याद्री देवराई पुरस्कृत मा.विजयमाला कदम बीजतुलेतील बीजांचे रोपण
सह्याद्री देवराई पुरस्कृत मा.विजयमाला कदम बीजतुलेतील बीजांचे रोपण
सांगली: भारतीय संस्कृतीमध्ये वृक्षवल्लीचे स्थान अनन्यसाधारण आहे.हे ध्यानात घेऊन भारती विद्यापीठ आणि सह्याद्री देवराई या अग्रगण्य संस्थानी, मा. विजयमाला पतंगराव कदम तथा वहिनीसाहेब यांच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून, देव वृक्षांच्या तसेच औषधी वनस्पतींच्या बिजांची तुला एप्रिल २०२५ मध्ये पुणे येथे संपन्न झाली. या ऐतिहासिक उपक्रमात बीजतुलेतील बीजांचे बीजारोपण महाराष्ट्रात होणे संकल्पित आहे असे विधान डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. विवेक रणखांबे यांनी केले. त्यांच्या शुभहस्ते महाविद्यालयाच्या प्रांगणात 'बीजक' या झाडाचे बीजारोपण करण्यात आले.
'बीजक' या झाडाच्या लाकडाचा वापर पारंपारिक समाजात पाणी साठवण्यासाठी आणि भांडी तयार करण्यासाठी केला जात होता. या झाडाचे वैशिष्ट्य असे आहे की, याचे पाणी प्यायल्याने पाण्याचे उपचारात्मक गुण वाढवते.
या कार्यक्रमावेळी उपप्राचार्य डॉ.अमित सुपले, कनिष्ठ विभागप्रमुख प्रा. ए. एल.जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. रुपाली कांबळे, प्रा.आर.एस. काटकर, आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment