पत्रव्यवहार, स्पर्धापरीक्षाही मराठीत
पत्रव्यवहार, स्पर्धापरीक्षाही मराठीत
राज्य प्रशासनाच्या कारभारात राजभाषा मराठीचा (correspondence, competition in marathi) वापर सक्तीचा करण्यात आला असून, सर्व सरकारी कार्यालयांनी जनतेशी होणारा पत्रव्यवहार मराठीच करण्याची खबरदारी घ्यावी, असे आदेश राज्य सरकारने जारी केले आहेत. पत्रके, परवाने, नोंदवह्या, विभागीय नियम पुस्तिका, टिपण्या, नस्त्या, शेरे, अभिप्राय, अधिसूचना यात मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे, असे आदेशात स्पष्ट केले गेले आहे.
सरकारी पाट्या, फलक हे मराठीच हवेत. रेल्वे स्थानके, गावांची नावेही मराठीतच हवीत. 'बांद्रा' असे नाव न वापरता 'वांद्रे' असे वापरावे, अशी उदाहरणेही या आदेशात दिली गेली आहेत. सरकारी जाहिराती या किमान दोन मराठी वर्तमानपत्रांत प्रसिद्धीस देणे बंधनकारक असेल.
राज्याच्या प्रशासनात नोकरभरती करताना घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षाही मराठीतच असल्या पाहिजेत, संकेतस्थळावरील माहिती मराठीत हवी, आंतरराष्ट्रीय स्तराबाबत माहिती असेल तर इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये ती असावी, असे सरकारने आदेश दिले आहेत.
Post a Comment