yuva MAharashtra डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात पालक, शिक्षक सहविचार सभा संपन्न - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात पालक, शिक्षक सहविचार सभा संपन्न

 डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात पालक, शिक्षक सहविचार सभा संपन्न 

सांगली: भारती  विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात आर्ट्स, सायन्स व व्यवसाय शिक्षण विभागातर्फे पालक, शिक्षक सहविचार सभा पार पडली. यावेळी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे, कनिष्ठ विभागप्रमुख प्रा. ए. एल. जाधव, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.आर. एस. काटकर, सौ. दीपाली गाढवे, प्रा. एस. बी. पाटील, प्रा. पी. ए. केंगार, प्रा. एच.टी. मुल्ला आदि मान्यवर उपस्थित होते.

  या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ.दीपाली गाढवे यांनी या वेळी पालकांशी संवाद साधला. आपल्या मार्गदर्शनात त्या म्हणाल्या की, ‘बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे वर्ष आहे. 

बारावीच्या गुणांवरच विद्यार्थ्यांचे पुढील भवितव्य अवलंबून आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास करून आपली गुणवत्ता सिद्ध केली पाहिजे. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थ्यांसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत असतात. विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करून अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश निश्चित मिळते.'

      याप्रसंगी  अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्र. प्राचार्य डॉ. पोरे म्हणाले की, 'भारती विद्यापीठाचे संस्थापक- कुलपती मा. डॉ. पतंगराव कदम साहेबांनी ग्रामीण भागातील गोरगरिबांची मुले शिकावीत यासाठी सांगली शहरांमध्ये सुसज्ज असे हे महाविद्यालय स्थापन केले. भारती विद्यापीठाच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो गरीब विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे.  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांशी प्रत्यक्ष संवाद साधणे आवश्यक होते. म्हणून या पालक, शिक्षक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.  शिक्षकांनी काय केले पाहिजे  आणि  पालक म्हणून आपली भूमिका काय असावी हे याप्रसंगी समजून घेणे गरजेचे आहे.' 

    या वेळी प्रा. एस. बी. पाटील यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, 'पालक शिक्षक सभेचा मुख्य हेतू पालकांनी लक्षात घ्यायला हवा. टी.व्ही., मोबाईल यांसारख्या साधनांचा वापर कमी करायला हवा. विद्यार्थ्याला घरात अभ्यासासाठी पूरक वातावरण निर्माण करून देण्याची जबाबदारी ही आपली आहे. त्याचबरोबर त्याचे आरोग्य उत्तम कसे राहील हे ही पाहिले.'

      व्यवसाय शिक्षण विभागाचे प्रा. पी. ए. केंगार  यांनी पालकांशी संवाद साधताना म्हणाले की, प्रत्येक पालकाने पालक सभेत उत्साहाने सहभाग घ्यावा. कारण पालक व शिक्षक यांची साथ असेल तर विद्यार्थी नक्कीच उज्ज्वल भविष्य घडवू शकतात.

      या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कनिष्ठ विभागप्रमुख प्रा. ए. एल. जाधव यांनी केले. तर सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.आर. एस. काटकर यांनी  केले.

आभार प्रदर्शन प्रा. एच. टी. मुल्ला यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)