डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे आजी-माजी विद्यार्थी सुसंवाद उत्साहात संपन्न
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे आजी-माजी विद्यार्थी सुसंवाद उत्साहात संपन्न
येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने आजी-माजी विद्यार्थी सुसंवाद कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. सूक्ष्मजीवशास्त्रातील विद्यार्थी हे पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सध्या वेगवेगळ्या पदावरती सध्या कार्यरत आहेत. सदर पदावर जाण्याकरिता लागणाऱ्या क्षमता कौशल्ये व कराव्या लागणाऱ्या कामाचा आराखडा व जबाबदाऱ्या समजावून घेण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमात महाविद्यातील सूक्ष्मजीवशास्त्राचे सन 2022-23 या वर्षी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सर्व गोष्टी समजावून सांगितल्या. दूध प्रकल्प, अन्नप्रक्रिया उद्योग तसेच औषध निर्माण कंपनीमध्ये काम करणारे विविध अनुभव असणारे माजी विद्यार्थी या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. श्री प्रथमेश हजारे, श्री किरण एन्नम, श्री गौरव मस्के, श्री शुभम साळुंखे व श्री ऋषिकेश बोबडे यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज विद्यार्थ्यांचे प्रश्न, अडचणी विचारून घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मुलाखतीला जाताना त्यांचा पेहराव कसा असावा यापासून त्यांनी अभ्यास व अभ्यासाव्यतिरिक्त कोणत्या गोष्टींची माहिती करून घ्यावी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचे शंका निरसन केले.
सदर कार्यक्रमाकरिता सूक्ष्मजीवशास्त्रातील बी.एस्सी. भाग तीन व एम. एस्सी. भाग दोन चे विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सपना व्ही. वेल्हाळ तसेच स्वागत व प्रास्ताविक श्री. आरिफ ए. मुलाणी यांनी केले. कार्यक्रमाचे आभार कु. प्रिया एस. पवार यांनी व्यक्त केले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment