yuva MAharashtra डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे मध्यवर्ती युवा महोत्सवात यश - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे मध्यवर्ती युवा महोत्सवात यश

 डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे मध्यवर्ती युवा महोत्सवात यश


सांगली: शिवाजी विद्यापीठाच्या ४५ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवात डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. उत्कर्ष शहाजी कापसे हिने मेहंदी स्पर्धेमध्ये पाचवा क्रमांक मिळविला. उत्कर्षाने हे यश मिळवून भारती विद्यापीठ आणि डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली.

 या मध्यवर्ती युवा महोत्सवाच्या  यशाबद्दल महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे यांनी तिला पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व या मिळालेल्या यशाबद्दल कौतुक केले त्याचबरोबर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. ए. एल. जाधव यांनी विद्यार्थिनीचे अभिनंदन केले. 

सदर विद्यार्थिनीस सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. वर्षा कुंभार व सांस्कृतिक विभागातील सदस्यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनीही या विद्यार्थिनीचे अभिनंदन केले.

हा मध्यवर्ती युवा महोत्सव शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय मिरज येथे संपन्न झाला. या वर्षी  शिवाजी विद्यापीठाच्या  युवा महोत्सवामध्ये सदरच्या स्पर्धेत १७८ महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला होता.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)