डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय आणि सुभव प्रबोधिनी यांच्यामध्ये सामंजस्य करार
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय आणि सुभव प्रबोधिनी यांच्यामध्ये सामंजस्य करार
सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय आणि सुभव प्रबोधिनी, सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच सामंजस्य करार संपन्न झाला.
भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय हे उच्च शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी घडविणारे प्रतिष्ठित शैक्षणिक केंद्र आहे. तसेच सुभव प्रबोधिनी ही सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकासासाठी कार्यरत संस्था आहे.
दोन्ही संस्था समाजाभिमुख कार्यक्रम, विद्यार्थी विकास, संशोधन व कौशल्यवर्धनासाठी परस्पर सहकार्य करतील, या उद्देशाने हा सामंजस्य करार करण्यात येत आहे. या करारामुळे दोन्ही संस्थांना क्रीडा व स्पर्धा परीक्षा क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करण्यासाठी नवे व्यासपीठ मिळाले आहे.
यावेळी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा. (डॉ.) संजय पोरे, सुभव प्रबोधिनी, सांगोल्याचे संस्थापक- अध्यक्ष मा. भरत शेळके, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबई (ए. सी.पी.), प्रमुख प्रशिक्षक मा. तानाजी बनसोडे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. अमर तुपे, डॉ. दादा नाडे, प्रा. अक्षय खडतरे व प्रा. हर्षल वांगीकर आदि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मा.भरत शेळके म्हणाले की "दोन्ही संस्था मिळून भविष्यात विविध क्रीडा उपक्रम व स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण राबवू व गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होईल.त्यामुळे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करू शकतील असे मत व्यक्त केले.
या करारामध्ये विद्यार्थी- प्राध्यापक विनिमय जोड कार्यक्रम, प्रकल्प, प्रगत संशोधन अशा बहूआयामी बाबी यामध्ये राबविण्यात येणार आहेत. डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाच्या वतीने हा सामंजस्य करार संपन्न झाला. या करारामुळे महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा.(डॉ.) संजय पोरे व जिमखाना विभाग प्रमुख डॉ. अमर तुपे यांचे सर्व शैक्षणिक स्तरातून कौतुक होत आहे.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)

Post a Comment