डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात 'आंतरराष्ट्रीय ओझोन दिन' उत्साहात साजरा
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात 'आंतरराष्ट्रीय ओझोन दिन' उत्साहात साजरा
सांगली : येथील भारती विद्यापीठाच्या डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने 'आंतरराष्ट्रीय ओझोन दिन' उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी 'ओझोन' या विषयावर रांगोळी व भित्तीचित्रांद्वारे ओझोनचे महत्व आणि त्याच्या ऱ्हासामुळे होणारे परिणाम यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. एस. व्ही. पोरे होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, “आपण सर्वजण समाजाचे देणे लागतो, या भावनेतून प्रत्येकाने ओझोनचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या पाहिजेत तसेच विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधनाच्या दृष्टीने या रांगोळी व भित्तीचित्रांचे रूपांतर लेखन स्वरूपात करून ते प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध केले पाहिजे असे आवाहन केले.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अमित सुपले यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले की, ओझोनवरील संशोधन हे करिअर करण्याचे माध्यम आहे. त्यामुळे या क्षेत्रात येऊन करिअर घडवावे असे मत व्यक्त केले. याप्रसंगी भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. दादा नाडे यांनी ओझोनविषयी सखोल मार्गदर्शन करून त्याचे विविध शास्त्रीय पैलू विद्यार्थी समोर मांडले. कार्यक्रमाचे वेळी तुकाराम करपे या विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची वेळी प्रा. नंदकुमार नाटके, डॉ. अमर तुपे, प्रा. अक्षय खडतरे तसेच डॉ. एस.डी.खोत, डॉ. आर.आर. अंबी, प्रा. सौ. एन.डी.पाटील आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भौतिकशास्त्र विभागाची विद्यार्थिनी कु. काजल हिने केले तर आभार कु. मानसी शिंदे हिने मानले.या प्रसंगी महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment