डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत यश
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत यश
सांगली : येथील भारती विद्यापीठाचे डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय सांगली चा खेळाडू कु. पार्थ कोळी याने २०० व ४०० मी. फ्रीस्टाइल जलतरण स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला तसेच कु.आदित्य पवार याने १०० मी. फ्रीस्टाइल जलतरण स्पर्धेत द्वितीय क्रमांक व १०० व २०० मी. ब्रेस्ट स्ट्रोक स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच कु.पारस मडके यानेसुद्धा १०० मी. बटरफ्लाय जलतरण स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.
कु.आदित्य सायमोते याने जिल्हास्तरीय फ्रीस्टाइल ८४ वजन गट कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला.
अशाप्रकारे जलतरण व कुस्ती अशा दोन्ही क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी यश मिळवून भारती विद्यापीठ आणि डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली.
या स्पर्धेतील कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. व या मिळालेल्या यशाबद्दल कौतुक केले.
सदर विद्यार्थ्याना कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. ए. एल. जाधव, क्रीडा शिक्षक प्रा. एच. ए. गुरव यांचे मार्गदर्शन मिळाले. या निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment