डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी
सांगली : येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक रणखांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अमित सुपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, मानवता हे एक श्रेष्ठ मूल्य असून त्याला सत्य व अहिंसेची जोड मिळाली तर सामाजिक स्थैर्य अधिक बळकट होईल. महात्मा गांधीजींचे हे विचार आजही जागतिक स्तरावर सर्वमान्य आहेत. त्याचबरोबर खेड्याकडे चला, स्वदेशीचा पुरस्कार, साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचे ते पुरस्कर्ते होते. त्यांनी अहिंसेचा अर्थ जगाला सांगितला म्हणून त्यांचा जन्म दिवस हा 'जागतिक अहिंसा दिन' म्हणून साजरा केला जातो. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या विषयी बोलताना पुढे ते म्हणाले की, लालबहादूर शास्त्री यांच्या अंगी नम्रता, दृढता व आंतरिक शक्ती होती म्हणून ते समाजात लोकप्रिय होते. आजच्या तरुणांनी शास्त्रींच्या अंगी असलेले हे गुण आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यांचा 'जय जवान, जय किसान!' हा नारा आजही देशासाठी प्रेरणादायी आहे.
या कार्यक्रमावेळी सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. वर्षा कुंभार, प्रा.सतीश कांबळे, डॉ.नरेश पवार, प्रा.अमोल कुंभार, प्रा.मंगेश गावित, प्रा. नंदकुमार नाटके, प्रा.एस. बी. माने, प्रा.पी. ए. केंगार तसेच शिक्षकेतर सेवक व कर्मचारी उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment