भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात संपन्न
भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात संपन्न
सांगली:येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमांमध्ये उपस्थित सर्व प्राध्यापकांना विद्यार्थ्यांनी गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन सर्वांचे स्वागत केले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख प्रा. कु.भारती भावीकट्टी होत्या. अध्यक्षिय मार्गदर्शनात त्या विद्यार्थ्यांना उद्देशून बोलत असताना त्यांनी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. स्वतःमधील क्षमता ओळखणे आणि त्या क्षमतांचा पुरेपूर वापर करून घेणे महत्त्वाचे आहेच, पण त्याबरोबरच जगताना आपल्याला आनंद देतील असे छंद जोपासणे आणि आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करणे महत्त्वाचे आहे असे सांगितले. आजच्या काळात एकमेकांबरोबर प्रत्यक्ष संवाद साधणे, एकमेकांबद्दल आपुलकी व प्रेम जिव्हाळा निर्माण करणे, आई-वडिलांचा, शिक्षकांचा आदर करणे इत्यादी गोष्टी पुन्हा एकदा मूल्य शिक्षणाद्वारे सांगण्याची वेळ आली आहे. अशा गोष्टीमुळे मानसिक आधार मिळतो आणि विद्यार्थ्यांची मानसिक दृष्ट्या निकोप वाढ होण्यास मदत होते असेही त्या म्हणाल्या. आपल्या जवळची अशी कुणीतरी एखादी व्यक्ती असावी की त्या व्यक्तीजवळ आपण मन मोकळे करावे,राग लोभ मनात साचू देऊ नका, वाहत्या पाण्यासारखं मन निर्मळ ठेवा असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सूक्ष्मजीशास्त्राचे डॉ.जी. व्ही. माळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणातील सध्याची व पूर्वीची परिस्थिती विद्यार्थ्यांसमोर मांडली, याचबरोबर सध्याचे युग हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे युग आहे, या युगात जगताना विद्यार्थ्यांना शिक्षकांपेक्षा कृत्रिम बुद्धिमत्ता खूप महत्त्वाची वाटते पण ही कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवानेच बनवली आहे हे विद्यार्थ्यांनी विसरू नये असे प्रतिपादन केले.
सदर कार्यक्रमांमध्ये सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील प्राध्यापकांनी त्यांची मनोगत व्यक्त केले यामध्ये श्री. ए. ए. मुलाणी, कु. एस. व्ही. वेल्हळ, कु. पी. एस. पवार, कु. एस. व्ही. पाटील. व कु. एस. एस. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मनोगतात त्यांनी त्यांना भेटलेले उत्तम शिक्षक व त्यांचावर झालेला सदर शिक्षकांचा प्रभाव त्यांनी मांडला. शिक्षण घेत असताना उत्तम शिक्षक भेटणे खूप महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. आरिफ मुलाणी यांनी केले, सूत्रसंचालन कु.अश्विनी यादवने केले तर कु.महेक लगीवाले हिने आभार मानले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment