डॉ .पतंगराव कदम महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रा.(डॉ.) विवेक रणखांबे
डॉ .पतंगराव कदम महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रा.(डॉ.) विवेक रणखांबे
सांगली : येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात प्रा. (डॉ.) विवेक रणखांबे यांची प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी माजी प्र. प्राचार्य प्रा. डॉ. एस.व्ही.पोरे यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी भारती विद्यापीठाचे संस्थापक- कुलपती डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रा. (डॉ.) विवेक रणखांबे यांनी भारती विद्यापीठाच्या विविध घटक शाखांमध्ये २० वर्षे इंग्रजी विषयाच्या अध्यापनासह प्रभारी प्राचार्य पदाचा अनुभव आहे. तसेच यांनी यापूर्वी यशवंतराव मोहिते महाविद्यालय, पुणे येथे प्रभारी प्राचार्य म्हणून आणि कला शाखेचे अधिष्ठाता म्हणून काम केले आहे. अमेरिकेतील पहिल्या जागतिक मराठी साहित्य संमेलनासह कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्स येथील जागतिक परिषदेमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत.
त्यांच्या नियुक्तीबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, शालेय समितीच्या अध्यक्षा मा. विजयमाला कदम, आदरणीय आ. मोहनशेठ कदम, मा. डॉ. जितेश कदम तसेच महाविद्यालयातील सर्व वरिष्ठ, कनिष्ठ विभागातील प्राध्यापक शिक्षकेतर सेवक व कर्मचारी यांनी नवनियुक्त प्राचार्य प्रा.(डॉ.) विवेक रणखांबे यांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्राचार्य प्रा.(डॉ.) रणखांबे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, उच्चशिक्षणाच्या जागतिक स्तरावर होणारे बदल, भारतीय विद्यापीठांची आणि संलग्नित महाविद्यालयांची भूमिका, वर्तमान आणि भविष्याचा वेध घेताना सर्वांच्या योगदानाचे आवाहन यावेळी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अमित सुपले यांनी केले. तर आभार कनिष्ठ विभागप्रमुख प्रा. ए. एल. जाधव यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रोहिणी वाघमारे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)




Post a Comment