डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात गौरीची गाणी व खेळ कार्यक्रम उत्साहात साजरा
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात “गौरीची गाणी व खेळ” कार्यक्रम उत्साहात साजरा
सांगली: येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात महिला विकास समिती व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “पारंपारिक गौरीची गाणी आणि खेळ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे होते. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अमित सुपले, महिला विकास समितीच्या समन्वयक कु. भारती भाविकट्टी, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. वर्षा कुंभार, सर्व महिला प्राध्यापक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ.पोरे म्हणाले की, सामाजिक सांस्कृतिक वारसा व सलोखा राखण्यासाठी, पारंपरिक गाणी व खेळ पुढील पिढीमध्ये अवगत करून देण्यासाठी गौरीचे खेळ व गाणी यासारखा उपक्रम आयोजित करणे अत्यंत आवश्यक आहे. सणासंबंधीची व त्यातील प्रथांची, त्यातील विविध गाणी व खेळ या गोष्टींची वैज्ञानिक माहिती मुलींनी समजून घ्यावी. यातून पारंपारिक गाणी व खेळ शिकून घ्यावेत व उत्स्फूर्त सहभाग घ्यावा. मुलींनी आपल्या जुन्या पिढीकडून पारंपरिक गाणी शिकून घ्यावीत आणि ती लिहून काढावीत तसेच काही खेळांचे व्हिडिओ करावेत या माहितीचा संग्रह तयार करावा. एन.ई.पी. च्या अभ्यासक्रमानुसार आय. के. एस. मध्ये या सगळ्या गोष्टी आपण शिकण्यासाठी अंतर्भूत केलेले आहे. उपप्राचार्य डॉ.अमित सुपले म्हणाले की महिलांनी मंगळागौरीचा खेळ खेळल्यामुळे शारीरिक व्यायाम होऊन मानसिक दृष्ट्या सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो. शिवाय धावपळीच्या या युगात मंगळागौर हा खेळ महिलांसाठी एक पर्वणीच आहे.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. कु. भारती भाविकट्टी यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. रोहिणी वाघमारे यांनी केले. आभार डॉ. वर्षा कुंभार यांनी केले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment