भारती विद्यापीठ तर्फे औद्योगिक भेटीतून विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्राचा अनुभव
भारती विद्यापीठ तर्फे औद्योगिक भेटीतून विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्राचा अनुभव
सांगली : दि. ९/३/२०२६
भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम साहेब, संस्थेचे कार्यवाह व माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम साहेब यांच्या प्रेरणेने व उपक्रमशील प्राचार्य प्रा. डॉ. व्ही. ए. रणखांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली येथील बी.एस्सी. (तृतीय वर्ष) संगणक शस्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक औद्योगिक भेट शनिवार, दि. ७ मार्च २०२६ रोजी कोल्हापूर येथील वॉलस्टार टेक्नॉलॉजीज प्रा. लि. या आयटी कंपनीमध्ये आयोजित करण्यात आली होती.
या औद्योगिक भेटीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना वेब डेव्हलपमेंट, आयटी उद्योगातील कामकाजाची पद्धत तसेच व्यावसायिक वातावरण यांची प्रत्यक्ष माहिती मिळवून देणे हा होता. कंपनीतील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रातील विविध विभागांची कार्यपद्धती, प्रोजेक्ट मॅनेजमेंट पद्धती तसेच आधुनिक तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले.
AI चे आव्हान आहेच पण संधीचा शोध महत्वाचा
कॉम्प्युटर सायन्स विभाग प्रमुख प्रा. अमोल वंडे यांनी बदलत्या काळात आव्हानांना सामोरे जाताना आत्ता "आर्टिफिशियल इंटलीजन्स" चे क्षेत्र संधी म्हणून स्वीकारावे लागणार असल्याचे नमूद केले, त्याच सोबत ही औद्योगिक भेट यशस्वी करण्यासाठी भारती विद्यापीठाचे सहकार्य तसेच प्राचार्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले असे सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चॅटबॉट्स, क्लाउड आर्किटेक्चर आणि फुल-स्टॅक डेव्हलपमेंट यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. तसेच उद्योगातील कामाची संस्कृती, टीमवर्क आणि कौशल्यविकास याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
भेटीच्या शेवटी आयोजित प्रश्नोत्तर सत्रामध्ये कंपनीतील वरिष्ठ डेव्हलपर्स आणि व्यवस्थापकांनी विद्यार्थ्यांच्या शंका दूर केल्या. तांत्रिक मुलाखतीची तयारी, इंटर्नशिपच्या संधी तसेच विद्यार्थी जीवनातून व्यावसायिक आयुष्याकडे होणारा प्रवास याबाबत त्यांनी मौल्यवान मार्गदर्शन केले.
ही औद्योगिक भेट विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माहितीपूर्ण व प्रेरणादायी ठरली. आयटी उद्योगातील प्रत्यक्ष कामकाजाची ओळख मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरसाठी आवश्यक कौशल्यांची जाणीव झाली.
विभागप्रमुख प्रा. अमोल वंडे यांच्या सह, प्रा. सौ. प्रणाली पाटील, प्रा. सौ. अश्विनी पाटील तसेच सर्व विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. भारती विद्यापीठ व महाविद्यालयाच्या प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या उद्योगभेटींना कायम प्रोत्साहन दिले असून भविष्यात अशाच प्रकारच्या आणखी औद्योगिक भेटींचे आयोजन केले जाणार आहे.
.jpeg)

Post a Comment