डॉ. दादा नाडे यांचे “अवकाश संशोधनातील सुवर्णसंधी” विषयावर व्याख्यान
डॉ. दादा नाडे यांचे “अवकाश संशोधनातील सुवर्णसंधी” विषयावर व्याख्यान
सांगली : कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा येथे “अवकाश संशोधनातील सुवर्णसंधी” या विषयावर डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली येथील भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. दादा नाडे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान उत्साहात पार पडले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
डॉ. नाडे यांनी अवकाश संशोधन क्षेत्रातील वाढत्या संधी, करिअरचे विविध पर्याय तसेच नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध होत असलेल्या संधींचे सविस्तर विवेचन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात नवोन्मेषी दृष्टीकोन स्वीकारून संशोधनाची आवड जोपासण्याचे आवाहन केले. प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. ए. रणखांबे व उपप्राचार्य डॉ. ए. आर. सुपले तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी डॉ. दादा नाडे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)




Post a Comment