yuva MAharashtra डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अभिजितदादा कदम यांची जयंती साजरी - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अभिजितदादा कदम यांची जयंती साजरी

 डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अभिजितदादा कदम यांची जयंती साजरी


सांगली : येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अभिजितदादा कदम यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. ए. रणखांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. अमित सुपले म्हणाले की,  भारती विद्यापीठ हे ज्ञानदानात अग्रेसर आहेच त्याचबरोबर कला व क्रीडा क्षेत्रातही विशेष कामगिरी करत आहे. आदरणीय डॉ. पतंगराव कदम साहेब यांचे ज्येष्ठ चिरंजीव अभिजितदादा कदम यांना नेहमी वाटायचे की, भारती विद्यापीठातील विद्यार्थी हा  शिक्षणाबरोबरच कला आणि क्रीडा क्षेत्रातही चमकला पाहिजे. आज भारती विद्यापीठ सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहे हे त्यांचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार होताना दिसत आहे.

       या कार्यक्रमाच्यावेळी महाविद्यालयाचे कनिष्ठ विभागप्रमुख प्रा. अरुण जाधव हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. वर्षा कुंभार यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)