डॉ. पतंगराव कदम यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अभिवादन
डॉ. पतंगराव कदम यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अभिवादन
सांगली : महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते, पलूस–कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते तसेच भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती आदरणीय डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली येथे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) व्ही. ए. रणखांबे यांच्या हस्ते डॉ. पतंगराव कदम साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आपल्या मनोगतात प्राचार्य डॉ. रणखांबे म्हणाले की, “डॉ. पतंगराव कदम साहेब हे दूरदृष्टीचे शिक्षणतज्ज्ञ आणि समाजहितासाठी अखंड कार्य करणारे नेतृत्व होते. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील सर्वसामान्य आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रगतीची संधी उपलब्ध करून दिली. भारती विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी उभा केलेला शैक्षणिक वारसा आजही हजारो विद्यार्थ्यांना प्रेरणा देत आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी समाजासाठी सकारात्मक कार्य करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”
या स्मृतिदिनानिमित्त महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. वर्षा कुंभार यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी डॉ. पतंगराव कदम साहेबांच्या कार्याची आठवण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजोपयोगी कार्य करण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)


Post a Comment