डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट उत्साहात संपन्न
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट उत्साहात संपन्न
सांगली : भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली येथील रसायनशास्त्र विभागाच्या वतीने बी.एस्सी. व एम.एस्सी. विद्यार्थ्यांसाठी दिनांक २३ व २४ फेब्रुवारी २०२६ रोजी रोहा (रायगड) येथील Excel Industries येथे औद्योगिक शैक्षणिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते. ही औद्योगिक भेट विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, अनुभवसमृद्ध आणि प्रेरणादायी ठरली.
औद्योगिक भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी उत्पादन विभाग, गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळा तसेच संशोधन व विकास विभागाला प्रत्यक्ष भेट देऊन औद्योगिक प्रक्रियेची सखोल माहिती घेतली. उद्योगातील तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावरील उत्पादन प्रक्रिया, अत्याधुनिक यंत्रसामग्रीची कार्यपद्धती, कचरा व्यवस्थापन, औद्योगिक सुरक्षा नियम आणि गुणवत्ता नियंत्रण प्रणाली यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना उद्योगातील प्रत्यक्ष कार्यसंस्कृती अनुभवण्याची मौल्यवान संधी मिळाली.
विद्यार्थ्यांनी आधुनिक विश्लेषणात्मक उपकरणांचे प्रत्यक्ष निरीक्षण करून औद्योगिक कार्यपद्धतीचे बारकावे समजून घेतले. शैक्षणिक अभ्यासक्रमातील संकल्पना उद्योगात कशा अंमलात आणल्या जातात, याची प्रत्यक्ष अनुभूती विद्यार्थ्यांना मिळाल्याने त्यांच्या सैद्धांतिक ज्ञानात भरीव भर पडली.
या औद्योगिक भेटीत डॉ. विश्वभंर शिंदे, डॉ. अजित देशमुख, प्रा. संद्यारानी वडगावे, सौ. स्नेहल पाटील व श्री. पवन पवार यांच्यासह विद्यार्थी सहभागी झाले होते. या उपक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) व्ही. ए. रणखांबे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले. विभागप्रमुख प्रा. (डॉ.) एस. व्ही. पोरे तसेच उपप्राचार्य डॉ. अमित सुपले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
ही औद्योगिक भेट विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरली.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)



Post a Comment