डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालयांतर्गत एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालयांतर्गत एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालयांतर्गत एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
सांगली : डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अग्रणी महाविद्यालय अंतर्गत प्राध्यापक प्रबोधिनीच्या वतीने “निरामय जीवनासाठी मन आणि आहार” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) व्ही. ए. रणखांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे डॉ. चंद्रशेखर हलिंगळे (संचालक, मानसोपचार तज्ञ, व्यसनमुक्ती केंद्र व निर्मल हॉस्पिटल, मिरज) यांनी ‘निरामय जीवनासाठी मनाचे आरोग्य’ या विषयावर मार्गदर्शन करताना मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले. ताण-तणावमुक्त जीवन जगण्यासाठी सकारात्मक विचार, संतुलित जीवनशैली आणि नियमित व्यायाम आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर कु. अंजुम शेख (आहारतज्ज्ञ व संचालक, ब्लॉसम न्यूट्रीहब, मिरज) यांनी ‘निरामय जीवनासाठी आहार’ या विषयावर बोलताना म्हणाल्या की, संतुलित आहाराचे महत्त्व स्पष्ट करून निरोगी जीवनासाठी योग्य आहारपद्धतींबाबत माहिती दिली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. आर. सुपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कार्यशाळा समन्वयक प्रा. भारती भाविकट्टी यांनी केले. आभारप्रदर्शन अग्रणी महाविद्यालय समन्वयक प्रा. सतीश कांबळे यांनी मानले.सूत्रसंचालन डॉ. वर्षा कुंभार यांनी केले.
यावेळी डॉ. कृष्णा भवारी, प्रा. नलेश बहिरम, प्रा. मंगेश गावीत, प्रा. नंदकुमार नाटके, डॉ. रुपाली कांबळे आदी उपस्थित होते. याशिवाय महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच अग्रणी महाविद्यालय अंतर्गत येणारे सर्व समन्वयक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)





Post a Comment