yuva MAharashtra संगणक शास्त्र विभागातर्फे “करिअर ट्रेंडस् इन ए.आय. अँड आय. टी.” मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

संगणक शास्त्र विभागातर्फे “करिअर ट्रेंडस् इन ए.आय. अँड आय. टी.” मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न

 संगणक शास्त्र विभागातर्फे “करिअर ट्रेंडस् इन ए.आय. अँड आय. टी.” मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न


सांगली |  दि. 30  सप्टेंबर २०२६ :  

भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात उपक्रमशील प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे  यांच्या मार्गदर्शनाखाली संगणक शास्त्र विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी “करिअर ट्रेंडस् इन ए.आय. अँड आय. टी.” या विषयावर मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलते करिअर पर्याय, भविष्यातील रोजगाराच्या संधी आणि आवश्यक कौशल्ये याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे, हा या व्याख्यानाचा मुख्य उद्देश होता.

आयटी इन्फो अॅकॅडमी, सांगली च्या श्री. सुनील नलवडे  व श्री. मनीष माळी या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी Artificial Intelligence, Machine Learning, Data Science, Cyber Security, Cloud Computing, Software Development तसेच इतर आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांतील वाढत्या संधींची माहिती दिली. बदलत्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी तांत्रिक कौशल्यांसोबतच Problem Solving, Communication, Critical Thinking आणि Adaptability यांसारखी कौशल्ये विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांना ए.आय. मुळे आय. टी. क्षेत्रातील पारंपरिक नोकऱ्यांमध्ये होत असलेले बदल, नवीन रोजगाराच्या संधी, उद्योगाच्या अपेक्षा आणि भविष्यातील करिअर नियोजन याबाबत उपयुक्त मार्गदर्शन मिळाले. व्याख्यानादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रश्न विचारले.

कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ए.आय. अँड आय. टी. क्षेत्रातील भविष्यातील करिअरच्या संधींबाबत व्यापक दृष्टिकोन मिळाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी  उपप्राचार्य डॉ. अमित सुपले,  संगणक शास्त्र  विभागप्रमुख अमोल वंडे, प्रा. निकिता जाधव, प्रा. सुयश खुरपे यांच्या सह  विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.संगणक शास्त्र विभागाअंतर्गत विद्यार्थ्यांकरिता कार्यरत असणाऱ्या कॉम्प्युटर सायन्स सायन्स क्लब तर्फे सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)