डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे वुशू व रायफल शूटिंग स्पर्धेत यश
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे वुशू व रायफल शूटिंग स्पर्धेत यश
सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने शांतिनिकेतन लोक विद्यापीठ, सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या शालेय क्रीडा स्पर्धांअंतर्गत १८ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या वुशू स्पर्धेत भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत चार पदके मिळविली.
या स्पर्धेत कु. संस्कृती सचिन जगताप हिने सुवर्णपदक, तर कु. रसिका पांडुरंग मोहिते आणि प्रथमेश सतीश ताटे यांनी रौप्यपदके मिळविली.
तसेच, टारगेट फॉर गोल्ड शूटिंग अकॅडमी, स्फूर्ती चौक, विश्रामबाग, सांगली येथे झालेल्या रायफल शूटिंग स्पर्धेत यशराज राहुल भोसले याने कांस्यपदक मिळविले.
या यशासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच, प्रा. एस. डी. पाकले यांनी विद्यार्थ्यांना नियमित सराव आणि स्पर्धेच्या तयारीसाठी मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम, कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, शालेय समितीच्या अध्यक्षा मा. विजयमाला कदम तथा वहिनीसाहेब, भारती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे यांच्या संचालिका डॉ. अस्मिताताई जगताप, सहकार्यवाह डॉ. के. डी. जाधव, डॉ. एम. एस. सगरे, प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, कनिष्ठ विभागप्रमुख प्रा. आर. एस. काटकर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर सेवकांनी अभिनंदन केले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)



Post a Comment