yuva MAharashtra डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील विद्यार्थ्याचे शिवाजी विद्यापीठ स्तरावर उल्लेखनीय यश - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील विद्यार्थ्याचे शिवाजी विद्यापीठ स्तरावर उल्लेखनीय यश

 डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील विद्यार्थ्याचे शिवाजी विद्यापीठ स्तरावर उल्लेखनीय यश

सांगली: येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगली येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्याने शिवाजी विद्यापीठ स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इंग्रजी विभागाच्या बी.ए. भाग ३ मध्ये शिक्षण घेत असलेल्या रोहन डिसले याने शिवाजी विद्यापीठ आयोजित महाविद्यालयीन ज्ञानभारती नियतकालिक स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला आहे.

     रोहन डिसले याच्या उत्कृष्ट काव्यरचना, मांडणी, आणि कल्पकता यामुळे परीक्षकांनी त्याची द्वितीय क्रमांकासाठी निवड केली.

    या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) व्ही. ए. रणखांबे आणि उपप्राचार्य डॉ. अमित सुपले यांनी रोहनचे विशेष अभिनंदन केले. इंग्रजी विभागप्रमुख प्रा. रोहिणी वाघमारे तसेच नियतकालिकाचे संपादक डॉ. कृष्णा भवारी यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही त्याच्या यशाचे कौतुक करत पुढील शैक्षणिक व साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)