yuva MAharashtra डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

 डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

सांगली : येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी माजी राष्ट्रपती व  आदर्श शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन तसेच भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

सदर कार्यक्रम प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. 

        या कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. आर. सुपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारा महत्त्वाचा घटक आहे. बदलत्या शैक्षणिक परिस्थितीत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावरही भर देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील राहावे.

          ते पुढे म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षणामध्ये प्रभावी वापर करत असताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी असलेला संवाद आणि भावनिक नातेही जपले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि क्षमतांना वाव देऊन त्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सक्षम करणे ही शिक्षकांची जबाबदारी आहे.

          भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत ज्ञान पोहोचविण्याचे महान कार्य केले. त्यांच्या शैक्षणिक विचारांतून प्रेरणा घेऊन शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन डॉ. सुपले यांनी केले.

    यावेळी सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. रुपाली कांबळे, कनिष्ठ विभागप्रमुख प्रा. आर. एस. काटकर, यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम सांस्कृतिक विभागामार्फत आयोजित करण्यात आला.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)