डॉ. कदम महाविद्यालयात आंतरविद्याशाखिय कार्यशाळेचे आयोजन
डॉ. कदम महाविद्यालयात आंतरविद्याशाखिय कार्यशाळेचे आयोजन
सांगली: शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व भारती विद्यापीठाचे डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने अग्रणी महाविद्यालयांतर्गत 'क्लस्टर महाविद्यालयातील विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्यासाठी एनईपी-२०२० च्या उद्दिष्टांशी सुसंगत' या विषयावर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन सोमवार दि.०८ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाची प्राचार्य प्रा.(डॉ.) विवेकानंद रणखांबे यांनी दिली.
सदर कार्यशाळेच्या प्रमुख प्रवक्ते म्हणून फेलो आय. आय.ए. एस. सिमला चे (राष्ट्रपती भवन), प्राचार्य डॉ. उषा बंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.(डॉ.) विवेकानंद रणखांबे, भारती विद्यापीठाचे फिजिओथेरपी कॉलेज सांगली येथील प्राचार्या डॉ. स्नेहा कटके, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. आर. सुपले, कार्यशाळेचे समन्वयक डॉ. डी. पी. नाडे, प्रमुख अग्रणी महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. सतीश कांबळे, सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा.भारती भाविकट्टी, प्रा. कु रोहिणी वाघमारे, डॉ. अनिकेत जाधव आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेमध्ये विचारवंत व तज्ञ मंडळींचे व्याख्यान होणार असून पारंपरिक विद्यापीठ व अभिमत विद्यापीठ यांच्या एकत्रित ज्ञानाचा संगम या कार्यशाळेमध्ये होणार आहे. यावर्षीची होणारी कार्यशाळा नवीन शैक्षणिक धोरणाच्या धर्तीवर संपन्न होत आहे. ही कार्यशाळा सांगली मिरज परिसरातील सर्व उच्च शिक्षण संस्थांमधील प्रातिनिधिक विद्यार्थ्यांच्या साठी आयोजित करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवरिल मान्यवर वक्ते उपस्थित रहाणार असल्याने अशा व्यक्तींच्या विचारांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य प्रा.(डॉ.) रणखांबे यांनी केले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)

Post a Comment