yuva MAharashtra डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात पोस्टर व रांगोळीतून वन्यजीव संवर्धनाचा संदेश - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात पोस्टर व रांगोळीतून वन्यजीव संवर्धनाचा संदेश

 डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात पोस्टर व रांगोळीतून वन्यजीव संवर्धनाचा संदेश




    सांगली - डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात जागतिक वन्यजीव सप्ताहानिमित्त पोस्टर, मॉडेल व रांगोळी प्रदर्शन भरविण्यात आले. प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राणीशास्त्र विभागाने हा उपक्रम राबविला. यावेळी वन्यजीव सप्ताहाचा उद्देश स्पष्ट करताना डॉ. कणसे म्हणाले,  "भारतात १९५२ सालापासून दरवर्षी २ ते ८ ऑक्टोबर हा कालावधी वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा केला जातो. भारतीय वन्यजीव मंडळाने या सप्ताहाची सुरुवात केली. नामशेष होत चाललेल्या वन्यजीवांचे संरक्षण, त्यांच्या अधिवासाचे जतन आणि याबाबत समाजात जागरूकता निर्माण करणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. आज मानवाच्या अतिक्रमणामुळे अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अशावेळी तरुण पिढीने पुढाकार घेऊन वन्यजीव संरक्षणासाठी काम करणे ही काळाची गरज आहे."

    डॉ. ए. आर. सुपले यांनीही विद्यार्थ्यांनी पर्यावरण व वन्यजीव रक्षणासाठी पुढे यावे, असे मत व्यक्त केले. प्रा. नलेश बहिरम यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. वर्षा कुंभार यांनी स्वागत केले व प्रा. गणेश माळगे यांनी आभार मानले. यावेळी प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)