Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या नऊ विद्यार्थिनींची मल्होत्रा वेकफील्ड फाउंडेशन शिष्यवृत्ती साठी निवड

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या नऊ विद्यार्थिनींची 'मल्होत्रा वेकफील्ड फाउंडेशन शिष्यवृत्ती' साठी निवड
सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील नऊ विद्यार्थिनींना वेकफील्ड फाउंडेशन पुणे यांचेकडून 'मल्होत्रा वेकफील्ड फाउंडेशन शिष्यवृत्ती' प्राप्त झाली. फाउंडेशनकडून शास्त्र शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांना दरवर्षी पदवी, पदव्युत्तर व पीएच. डी. शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.

यावर्षी कदम महाविद्यालयातील एकूण नऊ विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती मिळाली असून त्यामध्ये कु. पूजा परमणे, कु.किशोरी शहापुरे, कु.मृणाली पाटील, कु.क्षितिजा राजमाने, कु.अश्विनी देसाई, कु.शुभांगी पाटील, कु.सानिका पवार, कु.प्रतीक्षा जाधव आणि कु.प्रियांका देशमुख यांचा समावेश आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थिनीचे अभिनंदन केले. यावेळी निवड झालेल्या विद्यार्थिनींचे कौतुक करताना डॉ. कणसे म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीत सातत्यपूर्ण अभ्यास करत उत्तम गुण मिळवलेल्या विद्यार्थ्याना त्यांची शैक्षणिक प्रगती करण्यासाठी अशा स्वरूपाच्या स्कॉलरशिप दिल्या जातात, विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करून आपली शैक्षणिक प्रगती करावी असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी कला व वाणिज्य विभागप्रमुख प्रा. टी. आर. सावंत, करिअर मार्गदर्शन कक्ष समन्वयक डॉ. टी. आर. लोहार, डॉ. ए. एच. जाधव व प्रा. एस. ए. कांबळे उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)