निसर्गाचा समतोल साधणे गरजेचे : प्रमोद चौगुले
निसर्गाचा समतोल साधणे गरजेचे : प्रमोद चौगुले
सांगली: 'मानव हा निसर्गाचा एक महत्त्वाचा घटक आहे. निसर्गाचा ऱ्हास होऊ नये यासाठी आपण सजग राहिले पाहिजे. त्याचबरोबर जागतिक तापमानवाढीसारख्या समस्या रोखण्यासाठी निसर्गाचा समतोल साधणे गरजेचे आहे,' असे प्रतिपादन प्रसिद्ध वास्तू विशारद प्रमोद चौगुले यांनी केले.
येथील शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिरात ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, निसर्गावर आपण अनेकवेळा अन्याय करूनही निसर्गाने आपल्याला माफ केले. परंतु निसर्गाची सहनशक्ती आता संपली आहे. म्हणूनच महापूर, कोरोना महामारी, भूकंप, पाणीटंचाई आशा अनेक नैसर्गिक आपत्तींचा आपल्याला सामना करावा लागत आहे. आपण वेळीच सावध झालो नाही तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतील असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सांगली शिक्षण संस्थेतील माजी मुख्याध्यापक अब्दुल शिकलगार हे होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना ते म्हणाले, निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे, त्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. प्रत्येकाने निसर्गाचे संवर्धन केले पाहिजे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. या प्रसंगी श्री.रमेश आप्पाजी शिरंबेकर (मा.अध्यक्ष सर्व सेवा सोसायटी), श्री. प्रमोद लांडे (उपसरपंच), श्री. दिलावर शिकलगार, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. विकास आवळे, प्रा. वाय सी. धुळगंड, प्रा. सौ. जे. डी. हाटकर, प्रा. डॉ. सौ. वर्षा कुंभार हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वंयसेवक कु. प्रणाली मोरे यांनी केले व सूत्रसंचलन स्वंयसेवक कु. वेदांतिका भोसले यांनी केले तर आभार स्वंयसेवक कु. वैष्णवी पाटील हिने मानले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment