डॉ. शिल्पा साळुंखे यांना इन्सो पुरस्कार जाहीर
डॉ. शिल्पा साळुंखे यांना 'इन्सो' पुरस्कार जाहीर
सांगली : भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय येथील रसायनशास्त्र विषयाच्या साहाय्यक प्राध्यापिका डॉ. शिल्पा साळुंखे यांना 'व्हीडीजीओओडी' या आंतरराष्ट्रीय संस्थेचा 'इन्सो' पुरस्कार जाहीर झाला आहे.
जगभरातील विज्ञान, इंजीनियरिंग, वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करणाऱ्या तरूणांसाठी हा पुरस्कार दिला जातो. जगभरातील तरूण संशोधकांना प्रोत्साहन देणे, संशोधन क्षेत्रात नवीन ज्ञानाची निर्मिती करणे या उद्देशाने आंतरराष्ट्रीय परिषद कार्य करीत असते. एकविसाव्या शतकात पदार्पण करत असतानाच जग अनेक विषयांमध्ये नवीन ज्ञान, नवकल्पना निर्मिती आणि प्रसाराच्या क्रांतिकारक कालावधीतून जात आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर तरूणांना संशोधन क्षेत्रात संधी मिळावी, प्रगती व्हावी, त्यांच्यात नवीन अंतर्दृष्टी निर्माण व्हावी या उद्देशाने हा पुरस्कार दिला जातो.
डॉ. शिल्पा साळुंखे यांचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांचे पीएच.डी. चे संशोधन जैविक दृष्ट्या सक्रीय संयुगांच्या फोटो फिजिकल आभ्यासाशी संबंधित आहे. त्यांनी केलेले संशोधन रसायनशास्त्रचे अभ्यासक, संशोधकांना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यांच्या या कार्यामुळे अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे.
डॉ. शिल्पा साळुंखे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल भारती विद्यापीठाचे सर्व अधिकारी, पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच संशोधन क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment