शिवाजी विद्यापीठ रोइंग क्रीडा स्पर्धेमध्ये डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे वर्चस्व कायम
शिवाजी विद्यापीठ रोइंग क्रीडा स्पर्धेमध्ये डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे वर्चस्व कायम
रोइंग या क्रीडा प्रकारात शिवाजी विद्यापीठ संघात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, प्रा. अमर तुपे व इतर मान्यवर
सांगली : दिनांक 14 व 15 फेब्रुवारी 2022 रोजी नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स इचलकरंजी येथे पार पडलेल्या शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय रोइंग क्रीडा स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा वर्चस्व गाजवत भारती विद्यापीठाच्या डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावत ही परंपरा अखंड ठेवली. डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाने यापूर्वी अनेक वेळा सर्वसाधारण विजेतेपद मिळवले आहे.
महाविद्यालयातील श्रीकांत सरसंबी, अजिंक्य भिसे, दिग्विजय पाटील, ओमकार जामदार, प्रथमेश यादव, श्रेयस यादव, साहिल पाटील व अमित पाटील अशा एकूण आठ विद्यार्थ्यांची पंजाब यूनिवर्सिटी, चंदिगड येथे होणाऱ्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी रोइंग (मेन) या स्पर्धेसाठी निवड झाली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा. डी. जी. कणसे यांनी शिवाजी विद्यापीठ संघात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचे कौंतुक केले. सदर विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण संचालक अमर तुपे व प्रा. रुपाली कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment