yuva MAharashtra डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचा रक्षाबंधननिमित्त सामाजिक उपक्रम - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचा रक्षाबंधननिमित्त सामाजिक उपक्रम

 डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचा रक्षाबंधननिमित्त सामाजिक उपक्रम

(कै. दादूकाका भिडे मुलांचे निरीक्षण गृह व बालगृहामध्ये कार्यक्रमाचे आयोजन)




सांगली : भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रक्षाबंधनाचे औचित्य साधून कै. दादूकाका भिडे मुलांचे निरीक्षण गृह व बालगृहामध्ये रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वतः बनवलेल्या राख्या तेथील मुलांना बांधून त्यांचे औक्षण करण्यात आले. बहीण-भावाच्या नात्यातील गोडवा कायम राहिला पाहिजे, ही संस्कृती टिकून राहावी यासाठी मुलांना खाऊचे वाटपही करण्यात आले.

यावेळी बालगृहातील शिक्षक दादासाहेब जाधव यांनी तेथील दैनंदिन शिक्षण, शिस्त व संस्थेविषयी माहिती सांगितली. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. वर्षा कुंभार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना रक्षाबंधन या सणाचे महत्त्व सांगितले, तर डॉ. कृष्णा भवारी यांनी आभार प्रदर्शन केले.

याप्रसंगी महाविद्यालयातील प्रा. शंकर पाकले, प्रा. जयश्री हाटकर, डॉ. विश्वंभर शिंदे, प्रा. नलेश बहिरम, प्रा. सतीश कांबळे तसेच महाविद्यालयातील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)