yuva MAharashtra भारती विद्यापीठ समाज प्रबोधन सप्ताह निमित्त संगणक शास्त्र विभागातर्फे मराठी शाळांना ग्रंथ भेट - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

भारती विद्यापीठ समाज प्रबोधन सप्ताह निमित्त संगणक शास्त्र विभागातर्फे मराठी शाळांना ग्रंथ भेट

भारती विद्यापीठ समाज प्रबोधन सप्ताह निमित्त संगणक शास्त्र विभागातर्फे मराठी शाळांना ग्रंथ भेट


सांगली: भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या जयंती व कार्यवाह आ. डॉ. विश्वजीत कदम साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त  समाज प्रबोधन सप्ताह उपक्रमाअंतर्गत डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली च्या संगणक शास्त्र विभागाच्या वतीने विद्यार्थी सहभागातून समाजोपयोगी व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला.

 या उपक्रमांतर्गत म.न. पा. शाळा क्र. ९, व द. ह. चव्हाण हायस्कूल, सांगलीवाडी या  मराठी माध्यमाच्या शाळांना शैक्षणिक ग्रंथांची भेट देण्यात आली व विद्यार्थ्याना खाऊ वाटप करण्यात आले. 

विभागप्रमुख प्रा.अमोल वंडे यांनी विद्यार्थ्याना माहिती देताना डॉ. पतंगराव कदम साहेबांचे व आ. डॉ. विश्वजीत कदम साहेबांचे कार्य सर्वानाच सदैव प्रेरणादायी असल्याचे नमूद केले.  त्याचसोबत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याकरिता आ. डॉ. विश्वजीत कदम साहेब यांनी मंत्रीपदाच्या काळात केलेले प्रयत्न महत्वाचे असल्याचे सांगितले.  विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होऊन त्यांच्या बौद्धिक व व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळावी, या हेतूने संगणक शास्त्र विभागाने पुढाकार घेतला असे  यांनी सांगितले.

महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य प्रा. (डॉ) विवेक रणखांबे यांच्या मार्गदर्शनाखाली,  आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञानासोबतच वाचनसंस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. मराठी भाषा, साहित्य, विज्ञान, सामान्य ज्ञान व प्रेरणादायी विषयांवरील ग्रंथांचा समावेश या ग्रंथभेटीत करण्यात आला.

या कार्यक्रमावेळी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग तसेच संगणक शास्त्र विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.  शाळा प्रशासनाने या उपक्रमाबद्दल भारती विद्यापीठ व संगणक शास्त्र विभागाचे आभार मानत, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वाढून शिक्षण अधिक समृद्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला.

सदर उपक्रमात संगणक शास्त्र विभागातील विभागप्रमुख प्रा. अमोल वंडे, प्रा.सौ. अश्विनी पाटील, प्रा. सौ. प्रणाली पाटील, प्रा. सौ. प्राची पाटील यांच्या सह विद्यार्थी उपस्थित होते.  विद्यार्थी सेवा सप्ताहाच्या माध्यमातून केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक जबाबदारीचे भान जपत समाजाशी नाते दृढ करण्याचा भारती विद्यापीठाचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे. भविष्यातही अशा उपक्रमांच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य सातत्याने राबविले जाईल, असे यावेळी संगणक शास्त्र विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)