yuva MAharashtra मा.विजयमाला कदम वहिनीसाहेब यांच्या हस्ते डॉ.दादा नाडे यांना नासातर्फे प्राप्त रेडिओ जोवे २.१ टेलिस्कोप चे अनावरण - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

मा.विजयमाला कदम वहिनीसाहेब यांच्या हस्ते डॉ.दादा नाडे यांना नासातर्फे प्राप्त रेडिओ जोवे २.१ टेलिस्कोप चे अनावरण

मा.विजयमाला कदम वहिनीसाहेब यांच्या हस्ते डॉ.दादा नाडे यांना नासातर्फे प्राप्त ‘रेडिओ जोवे २.१ टेलिस्कोप’चे अनावरण

सांगली : भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगली मधील भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. दादा नाडे यांना नासातर्फे प्राप्त झालेल्या ‘रेडिओ जोवे २.१ टेलिस्कोप’ या महत्त्वपूर्ण संशोधन उपकरणाचे अनावरण भारती विद्यापीठाच्या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा मा. विजयमाला कदम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या वेळी भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह डॉ. एम. एस. सगरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेकानंद रणखांबे, उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. अरूण जाधव उपस्थित होते.

डॉ. नाडे यांना SARA Teacher Grant अंतर्गत महत्त्वपूर्ण Radio Jove 2.1 हा संशोधनक्षम रेडिओ टेलिस्कोप प्रदान करण्यात आला आहे. हा टेलिस्कोप ज्युपिटर, सूर्य, पृथ्वी तसेच मिल्की वे गॅलॅक्सी यांच्या वातावरणातील बदलांचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. मा. विजयमाला कदम तथा वहिनीसाहेब यांनी डॉ. नाडे यांच्या या बहुमोल संशोधन कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले. अशाप्रकारच्या गुणवत्तापूर्ण संशोधनासाठी भविष्यात महाविद्यालय आणि भारती विद्यापीठ नेहमीच सर्वतोपरी सहकार्य करील, अशी ग्वाही त्यांनी दिली. याप्रसंगी नाडे यांनी उपस्थित मान्यवरांना आपल्या संशोधनाचे महत्त्व आणि उपकरणाची उपयोगिता या विषयी सविस्तर माहिती सांगितली.

यापूर्वीही डॉ. नाडे यांना Stanford University कडून पृथ्वीच्या आयनोस्फियर अभ्यासासाठी SUPER SID हे प्रतिष्ठित उपकरण मिळालेले आहे. तसेच त्यांनी IITM Pune यांच्या सहकार्याने कोल्हापूर येथे Space and Atmospheric Science Center ची स्थापना केली असून, आवश्यक संशोधन साहित्य त्यांनी विविध अनुदानातून मिळवले आहे. Space & Atmospheric Sciences क्षेत्रातील त्यांचे संशोधन राष्ट्रासाठी मोलाचे ठरत आहे. त्यांच्या या कामगिरीची नोंद अनेक शिक्षण व संशोधन संस्थांनी घेतली आहे. त्यांच्या संशोधन कार्याबद्दल विविध स्तरांवर मानाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. दादा नाडे, प्रा. नंदकुमार नाटके, डॉ. रवी अंबी, डॉ. संभाजी खोत व प्रा. नयन पाटील यांचे मनापासून कौतुक केले आणि त्यांना संशोधन कार्यास शुभेच्छा दिल्या.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)