yuva MAharashtra डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या एन.सी.सी. विभागाची राष्ट्रीय पातळीवर दमदार कामगिरी - भारतीय सैन्यदल व वायुदलात चार विद्यार्थ्यांची निवड - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या एन.सी.सी. विभागाची राष्ट्रीय पातळीवर दमदार कामगिरी - भारतीय सैन्यदल व वायुदलात चार विद्यार्थ्यांची निवड

 डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या एन.सी.सी. विभागाची राष्ट्रीय पातळीवर दमदार कामगिरी

(भारतीय सैन्यदल व वायुदलात चार विद्यार्थ्यांची निवड)


सांगली : येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली येथील एन.सी.सी. विभागाने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करत राष्ट्रीय पातळीवर महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवला आहे. महाविद्यालयातील चार एन.सी.सी. कॅडेट्सची थेट भारतीय सैन्यदल व भारतीय वायुदलामध्ये निवड झाली असून, ही बाब संपूर्ण शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरत आहे. या यशामध्ये

कु. आदित्य नलवडे, कु.समरजीत पाटील व कु. किशोर कोळी यांची भारतीय सैन्य दलात, तर कु. गुलाबराव पाटील यांची भारतीय वायुदलात निवड झाली आहे.

या निवडीमुळे महाविद्यालयातील एन.सी.सी. विभागाच्या शिस्तबद्ध प्रशिक्षण पद्धतीचे व सातत्यपूर्ण मार्गदर्शनाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना संरक्षण सेवांमध्ये जाण्याची संधी मिळू शकते, याचे हे जिवंत उदाहरण आहे.

एन.सी.सी. विभागाचे समन्वयक डॉ. महेश कोल्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक कणखरपणा, नेतृत्वगुण, शिस्त व देशसेवेचे मूल्य यांचे प्रभावी प्रशिक्षण देण्यात आले. यासोबतच महाविद्यालयाचे प्राचार्य 

प्रा. डॉ. विवेकानंद रणखांबे, उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, कनिष्ठ विभागप्रमुख प्रा. अरुण जाधव यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन व प्रेरणा या यशामागे महत्त्वाची ठरली.

या यशाबद्दल  महाविद्यालयाच्या वतीने निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या पुढील देशसेवेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)