Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अभिजितदादा कदम यांची जयंती साजरी

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अभिजितदादा कदम यांची जयंती साजरी
 
सांगली : येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अभिजितदादा कदम यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे  विद्यार्थ्यांना संदेश देताना म्हणाले की, भारती विद्यापीठ हे शैक्षणिक क्षेत्राबरोबरच कला व क्रीडा क्षेत्रातही उत्तम कामगिरी करत आहे. आदरणीय डॉ. पतंगराव कदम साहेब यांचे ज्येष्ठ चिरंजीव अभिजितदादा कदम यांना नेहमी वाटायचे की, भारती विद्यापीठातील विद्यार्थी हा विशेषतः सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबातील असल्यामुळे त्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे. पैसे नाहीत म्हणून शिक्षण नाही असे होऊ नये म्हणून भारती विद्यापीठाने आजपर्यंत हजारो वंचित आणि गरीब विद्यार्थ्यांना फी सवलत दिली. या धोरणामुळे भारती विद्यापीठातून अनेक विद्यार्थी शिकून मोठ्या पदावर कार्यरत आहेत. आज सर्वच क्षेत्रांत भारती विद्यापीठाचे नावलौकिक आहे हे अभिजित कदम यांचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार होताना दिसत आहे.


       
या कार्यक्रमाच्यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, प्रा. टी. आर. सावंत हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख डाॅ. नितीन गायकवाड यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.


(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)