Header Ads

Loknyay Marathi

सुक्ष्मजीवशास्त्र विषयातील पदवी विभागाची शैक्षणिक सहल उत्साहात

सुक्ष्मजीवशास्त्र विषयातील पदवी विभागाची शैक्षणिक सहल उत्साहात


दि. २९/०१/२०२४- वर्गातील शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना आपल्या विषयातील उपयोजित भाग अवगत व्हावा, या उद्देशाने शिवाजी विद्यापीठ अभ्यास मंडळाने क्षेत्र भेट समाविष्ट केली आहे. तेथील आधुनिक तंत्र, कार्यप्रणाली विद्यार्थ्यांना माहीत असणे हा त्यामागील उद्देश असावा. हाच उद्देश समोर ठेवुन, येथील भारती विद्यापीठाच्या डॅा. पतंगराव कदम महाविद्यालयातील सुक्ष्मजीवशास्त्र विभागाने एकदिवसीय शैक्षणिक सहल आयोजित केली होती. या क्षेत्रभेटीमध्ये सुक्ष्मजीवशास्त्र विषयातील बी. एस्सी. भाग २ व ३ मधील एकुण ५० विद्यार्थी व ३ प्राध्यापक डॉ. एम्. जे. धनवडे, श्री. ए. ए. मुलाणी, कु. एस्. ए. कांबळे सहभागी होते. सदर सहलीत क्षेत्रभेटीसोबत विद्यार्थ्यांनी सागरेश्वर अभयारण्यास भेट दिली. येथे विद्यार्थ्यांनी बसमधून जंगल सफारीचा मनसोक्त आनंद घेतला. यानंतर वांगी येथील डॅा. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्यातील डिस्टीलरी विभागास भेट दिली. यांत वापरले जाणारे मोलॅसिस, यीस्ट, किण्वणाची प्रक्रिया, तापमान, सामू याचे वैज्ञानिक पद्धतीने विश्लेषण तेथील डिस्टीलरी विभागप्रमुखांनी विद्यार्थ्यांना दिले. याचबरोबर पुढे त्यांनी किण्वण पश्चात प्रक्रिया म्हणजेच डिस्टीलेशन बद्दल माहिती दिली व त्यातुन तयार होणारे पदार्थ, त्यांचा उपयोग, विविध क्षेत्रांतील त्या पदार्थांची मागणी याबद्दल माहिती दिली. यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या शंका विचारुन त्याची उत्तरे मिळविली. विद्यार्थ्यांकरिता त्यांनी चहा पानाचे व नियोजन केले होते. यानंतर इस्लामपुर येथील राजारामबापू दुध संघास भेट दिली. या दुध संघात दुध संकलन करणेपासून ते त्यावरील विविध प्रक्रिया व उत्पादने याबद्दलची सखोल माहिती तेथील विभागप्रमुखांनी विद्यार्थ्यांना दिली. याचबरोबर वरील बाबींमध्ये सूक्ष्मजीवशास्त्र कसे महत्त्वाचे आहे, जंतुंची तपासणी करण्याकरिता वापरल्या जाणाय्रा विविध चाचण्या, त्याचे महत्त्व, दही व पनीर बनविण्याकरिता वापरले जाणारे सुक्ष्मजीव यासारख्या गोष्टींचा उलगडा केला. सदरच्या भेटप्रसंगी दुध संघाने सर्वांना लस्सी दिली. या सहल ही सुक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्ररा. कु. भारती. का. भावीकट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांच्या परवानगीने पार पडली.



(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)