Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील सुक्ष्मजीवशास्त्र विभागात जैवतंत्रज्ञानातील आधुनिक घडामोडी या विषयावर मार्गदर्शन

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील सुक्ष्मजीवशास्त्र विभागात जैवतंत्रज्ञानातील आधुनिक घडामोडी या विषयावर मार्गदर्शन


सांगली, दि. ०१/०२/२०२४ येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे माजी विद्यार्थी डॅा. विकास कापसे यांनी सदिच्छा भेट दिली आणि पदवी व पदव्युत्तर सूक्ष्मजीवशास्त्राच्या विद्यार्थ्यांना जैवतंत्रज्ञानातील आधुनिक घडामोडी या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनात त्यांनी सर्वप्रथम आपल्या महाविद्यालयात प्रवेश का घेतला व भविष्यात त्याचा कसा फायदा झाला हे सांगितले. यानंतर पुढे त्यांनी जैवतंत्रज्ञानातील आधुनिक संशोधन व इंडस्ट्रीमधील नोकरीच्या संधींबद्दल मार्गदर्शन केले. सध्या ते आंतरराष्ट्रीय जैवतंत्रज्ञान केंद्र, दिल्ली येथे पोस्ट डॅाक्टरेट करत आहेत. याकरिता त्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. ती मिळविण्याकरिता त्यांनी अपार कष्ट केले हे त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनात नमूद केले. पुढे त्यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करताना विद्यार्थ्यांच्या अडचणी व प्रश्न विचारून घेतले आणि त्यांचे शंका निरसन केले. तसेच त्यांनी परदेशात उपलब्ध असलेल्या शिक्षणाच्या संधी,त्याकरिता मिळणारी शिष्यवृत्ती, तेथे येणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या स्वतःच्या संशोधनातील कामाविषयी आणि मिळालेल्या निष्कर्षाविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना दृ्कश्राव्य माध्यमातून मार्गदर्शन केले.



सदर कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. अरीफ मुलाणी यांनी केले. विभागप्रमुख प्रा. कु. भारती भावीकट्टी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. त्यांनी पुष्षगुच्छ देउन पाहुण्यांचे स्वागत केले व अध्यक्षीय मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. मारुती धनवडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाकरिता पदवी व पदव्युत्तर सुक्ष्मजीवशास्त्राचे  सर्व विद्यार्थी उपस्थित होते.


(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)