डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अभिजीत (दादा) कदम यांच्या स्मृतीस अभिवादन
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अभिजीत (दादा) कदम यांच्या स्मृतीस अभिवादन
सांगली : येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती स्वर्गीय डॉ.पतंगराव कदम साहेब व आदरणीय विजयमाला कदम उर्फ वहिनीसाहेब यांचे ज्येष्ठ सुपुत्र स्व.अभिजीत (दादा) कदम यांच्या स्मृतीदिनी अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य (डॉ.) व्ही.ए.रणखांबे यांनी प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहिली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे कनिष्ठ विभागप्रमुख प्रा.अरुण जाधव हे स्व.अभिजीत (दादा) कदम यांच्या आठवणींना उजाळा देत म्हणाले की,' अभिजीत दादा हे संस्कारशील, हुशार, दूरदृष्टीचे, सुशील, दिलदार व मनमिळाऊ व्यक्तिमत्व होते. उत्तम संवाद क्षमता, सर्वसमावेशक नेतृत्व या गुणांमुळे ते नेहमीच आदर्शवत ठरले. साहेबांच्या आयुष्यात एक उमदे नेतृत्व अपघाताने जाणे ही भरून न येणारी पोकळी निर्माण झालेली असतानाही माननीय साहेब, वहिनीसाहेब, डॉ. विश्वजीत कदम उर्फ बाळासाहेब, डॉ.अस्मिताताई हे सर्वजण या आघाताने खचून गेलेले असतानाही, "अभिजीत कदम हे आपण आपल्या भारती विद्यापीठाच्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात पाहू!" असा आशावाद व्यक्त करत माननीय साहेबांनी त्यांच्या नावाने पुणे येथील स्व.अभिजीत (दादा) कदम मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने मानवता पुरस्कार सुरू ठेवले.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अमित सुपले तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)



Post a Comment