स्टार्ट रेस्पेक्टिंग युवर बॉडी: डॉ. विवेक रणखांबे
स्टार्ट रेस्पेक्टिंग युवर बॉडी: डॉ. विवेक रणखांबे
सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली आणि प्रॉक्टर अँड गॅम्बल कंपनी, मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने "व्हिस्पर हायजिन प्रोग्रॅम: माय व्हॉइस माय चॉईस" या कार्यक्रमाचे आयोजन, विद्यार्थिनी व महिला प्राध्यापिका यांचे साठी शुक्रवार दि.१४/११/२०२५ रोजी करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी कंपनीच्या वतीने सौ. निकिता परदेशी यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. व्ही. ए. रणखांबे मार्गदर्शन करताना म्हणाले की, विद्यार्थिनींनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. यावेळी "Respect your body" असा मोलाचा संदेश त्यांनी दिला व महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थिनीनी आपल्या कुटुंबात आणि समाजामध्ये आरोग्यदूत म्हणून कार्यरत असावे, अशी अपेक्षा व्यक्त करून कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ए. एल. जाधव, प्रा. आर. एस. काटकर, प्रा. सौ. भारती भावीकट्टी आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. सौ. वासंती गावडे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रा. प्राची पाटील यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापिका, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)



Post a Comment