yuva MAharashtra मातृशक्तीच्या हस्ते भारतीय संविधान ऑनलाईन जनरल नॉलेज टेस्टचे उद्घाटन - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

मातृशक्तीच्या हस्ते भारतीय संविधान ऑनलाईन जनरल नॉलेज टेस्टचे उद्घाटन

 मातृशक्तीच्या हस्ते भारतीय संविधान ऑनलाईन जनरल  नॉलेज टेस्टचे उद्घाटन



सांगलीदि. ०३ डिसेंबर २०२५

  भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगली येथे संविधान अमृत महोत्सवानिमित्त घर घर संविधान उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, राज्यशास्त्र विभाग, एन. सी. सी.विभाग व  एन. एस. एस. विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २० मिनिटांची ४० गुणांची भारतीय संविधान जनरल  नॉलेज टेस्ट ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. 

    सदर परीक्षेची ऑनलाईन लिंक महाविद्यालयातील मातृशक्तीच्या हस्ते मा. प्राचार्य.प्रा.डॉ.विवेकानंद रणखांबे यांच्या विशेष उपस्थितीत महाविद्यालयाच्या सर्व व्हाट्सअप ग्रुपवर पाठविण्यात आली. संविधानाने स्त्रीपुरुष समानता दिलेली असतानाही आपल्या देशांत अजूनही स्त्रीयांना दुय्यम स्थान दिले जाते. सर्व क्षेत्रांत मात्र स्त्री शक्तीचे वर्चस्व दिसून येते. देशाच्या राष्ट्रपतीपदी द्रोपदी मुर्मू कार्यरत असल्याचा आम्हा महिलांना सार्थ अभिमान आहे. महिलांना प्रोत्साहित करण्याच्या हेतूने या क्षमता चाचणीचे उद्घाटन मातृशक्तीच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयातील  सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी यांनी जनरल  नॉलेज टेस्ट मध्ये  उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

  रिक्षेच्या समन्वयक म्हणून राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. वंदना सातपुते यांनी काम पाहिले. सदर परीक्षेच्या उद्घाटनप्रसंगी उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, ज्युनिअर विभागप्रमुख प्रा. अरुण जाधव, एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. रुपाली कांबळे, प्रा. मंगेश गावित, एन.सी.सी. अधिकारी डॉ. महेश कोल्हाळ, प्रा. रोहिणी वाघमारे आदि उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)