yuva MAharashtra डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी

 डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी

     सांगली: येथील भारती विद्यापीठाच्या डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमाचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या वेळी महाविद्यालयाचे  प्राचार्य प्रा. डॉ. विवेक रणखांबे म्हणाले की, सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या एकीकरणात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. भारतातील पाचशेच्या वर संस्थाने एकत्र करणे हे सोपे काम नव्हते.  एखाद्या स्थापित शक्तीच्या विरोधात लढायचे इतके सोपे नसते. देशात शेकडो वर्षे अनेक संस्थाने व राजेशाही असताना लोकशाहीचे नुकतेक उगम झाले होते. अशा वेळी लोकशाहीचे, समतेचे मूल्य रुजवणे आणि सर्वच्या सर्व संस्थानिकांना  व राजघराण्यांना एका समान सूत्रात बांधायचे, त्यासाठी संस्थांने खालसा करून स्वराज्यात खऱ्या अर्थाने लोकशाहीची स्थापना करायची ही गोष्ट सोपी नव्हती. म्हणूनच सरदार वल्लभभाई पटेल यांना लोहपुरुष असे म्हटले जाते. 

     स्वातंत्र्यानंतर भारतातील सुमारे ५६५ संस्थानांना एकत्र करून एक अखंड राष्ट्र निर्माण करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. तो त्यांच्या तत्त्वाचा विजय आहे असे मत व्यक्त केले.

    यावेळी मराठी विभाग प्रमुख डॉ.कृष्णा भवारी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचा आढावा घेतला.  याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. अरुण जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. वर्षा कुंभार यांनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागातर्फे करण्यात आले होते. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.




(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)