yuva MAharashtra आंतर-विद्याशाखीय पदव्यांनी मंडीत: पंडित नेहरू - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

आंतर-विद्याशाखीय पदव्यांनी मंडीत: पंडित नेहरू

आंतर-विद्याशाखीय पदव्यांनी मंडीत: पंडित नेहरू 

प्रा.रवींद्र काटकर




     सांगली: येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात  भारताचे पहिले पंतप्रधान  पंडित जवाहरलाल नेहरू जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक रणखांबे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागातील प्रा. श्री. रवींद्र काटकर आपल्या मनोगतात म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरू यांनी आधुनिक भारताची पायाभरणी केली आणि विज्ञान, शिक्षण आणि लोकशाही या घटकांना मोठे प्रोत्साहन दिले. त्यांचे असणारे व्यक्तिमत्त्व उदारमतवादी आणि राष्ट्रनिर्मितीच्या भावनेस प्रोत्साहन देणारे होते. 

     पंडित नेहरू यांच्या मते, शिक्षण हे एका मर्यादित विषयांचे नसावे तर ते वेगवेगळ्या विषयांचे असावे. त्यामुळे आंतरविद्याशाखीय शिक्षण हे राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी कायदा, इतिहास व विज्ञान अशा आंतरविद्याशाखीय विषयाचा अभ्यास व लेखन केले. तसेच लहान मुलांच्यावर असलेल्या प्रेमामुळे त्यांना ‘चाचा नेहरू’ म्हणून ओळखले जाते. त्यांचा हा जन्मदिवस देशात दरवर्षी ‘बालदिन’ म्हणून साजरा केला जातो.

     यानंतर प्रा.काटकर यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनकार्याचा धावता आढावा घेतला. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक रणखांबे, उपप्राचार्य डॉ. ए. आर. सुपले, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. ए. एल. जाधव, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. वर्षा कुंभार, तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)