डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. कणसे म्हणाले, “अण्णाभाऊ साठे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी कथा, कादंबरी, कविता, पोवाडा आणि लोकनाट्य अशा विविध साहित्य प्रकारांतून समाजजीवनाचे वास्तव प्रभावीपणे मांडले. खेडेगावात जन्मलेले अण्णाभाऊ हे महान साहित्यिक तर होतेच, त्याचबरोबर ते थोर समाजसुधारक, चळवळीतील कार्यकर्ते आणि तत्त्वचिंतक होते. वंचित व शोषित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला.”
लेखन प्रेरणा दिनानिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्य व साहित्यिक योगदानावर आधारित निबंध स्पर्धा, कथा लेखन आणि काव्य लेखन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण १३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. रुपाली कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. वर्षा कुंभार, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)









Post a Comment